पाली भाषेत :-

१०० यो ब्राह्मणं वा समणं वा अञ्ञं वा पि वनिब्बकं।
मुसावादेन वञ्चेति तं पराभवतो मुखं।।१०।।

१०१ इति हेतं विजानाम पञ्चमो सो पराभवो।
छट्ठमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।११।।

१०२ पहूतवित्तो पुरिसो सहिरञञो सभोजनो।
एको भुञ्जति सादूनि तं पराभवतो मुखं।।१२।।

१०३ इति हेतं विजानाम छट्ठमो सो पराभवो।
सत्तमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।१३।।

१०४ जातित्थद्धो धनत्थद्धो गोत्तत्थद्धो च यो नरो।
स ञातिं अतिमञ्ञेति तं पराभवतो मुखं।।१४।।

मराठीत अनुवाद :-

१००. जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसर्‍या एकाद्या गरीब माणसाला खोटें बोलून ठकवितो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (१०)

१०१. हा पांचवा पराभव आम्हांस समजला. भगवन्, सहावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (११)

१०२ पुष्कळ संपत्ति, धन आणि अन्न असलेला मनुष्य गोड गोड अन्न एकटाच खातो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (१२)

१०३ हा सहावा पराभव आम्हांस समजला. भगवन्, सातवें पराभवाचें कारण कोणतें तें सांग (१३)

१०४. कुळाच्या, धनाच्या आणि गोत्राच्या गर्वानें फुगून जाऊन जो पुरुष आपल्या आप्तांची अवहेलना करतो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (१४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel