पाली भाषेत :-

९७७ सो अस्सकस्स विसये मूळकस्स१(१ रो., सी.-अळकस्स.) समासने।
वसि२(२ रो.-वसी.) गोधावरीलकूले उञ्छेन च फलेन च।।२।।

९७८ तस्सेव उपनिस्साय गामो च विपुलो अहु।
ततो जातेन आयेन महायञ्ञं अकप्पयि।।३।।

९७९ महायञ्ञं यजित्वान पुन पाविसि अस्समं।
तस्मिं पतिपविट्ठम्हि अञ्ञो आगञ्छि३(३ म.-आगच्छि.) ब्राह्मणो।।४।।

९८० उग्घट्टपादो तसितो पंकदन्तो रजस्सिरो।
सो च नं उपसंकम्म सतानि पञ्च याचति।।५।।

मराठीत अनुवाद :-

९७७. तेथें अस्सक आणि मूळक या दोन राजांच्या सरहद्दीजवळ१ (१. येथें अट्ठकथेला अनुसरून अर्थ दिला आहे. पण मूळकाच्या सरहद्दीवर आणि अस्सकाच्या हद्दींत, असाही अर्थ करतां येण्यासारखा आहे.) गोदावरीतीरीं तो उञ्छवृत्तीनें आणि फलमूलादिकांनीं आपली उपजीविका करून राहिला. (२)

९७८ त्याच्या आजूबाजूला एक मोठा गांव वसला. त्यांतून त्याला जें मिळालें तें घेऊन त्यानें एक मोठा यज्ञ केला. (३)

९७९ मोठा यज्ञ आटोपून पुन: तो आश्रमांत गेला. तो आश्रमांत गेल्याबरोबर तेथें दुसरा एक ब्राह्मण आला. (४)

९८० त्याच्या पायांना घट्टे पजले होते, दांत मलिन झाले होते, डोकें धुळीनें भरलें होते व तो तृषित झाला होता. तो बावरीजवळ येऊन पांचशें (कार्षापण) मागूं लागला. (५)

पाली भाषेत :-

९८१ तमेनं बावरि दिस्वा आसनेन निमन्तयि।
सुखं च कुसलं पुच्छि इदं वचनमब्रवि१।।६।। (१सी.-अब्रुवि.)

९८२ यं खो२ २(२ – २ म.- चे मम.)ममं देय्यधम्मं सब्बं विस्सज्जितं मया।
अनुजानाहि मे ब्रह्मे नत्थि पञ्च सतानि मे।।७।।

९८३ सचे मे याचमनस्स भवं नानुपदस्सति३।(३म.-दिस्सति, देसन्ति.)
सत्तमे दिवसे तुय्हं मुद्धा फलतु सत्तधा।।८।।

९८४ अभिसंखरित्वा४ कुहको भेरवं सो अकित्तयि५। (४ म.- संखारेत्वा.)( ५म.-पकित्तयि.)
तस्स तं वचनं सुत्वा बावरि दुक्खितो अहु६।।९।। (६ म.- अहू.)

९८५ उस्सुस्सति अनाहारो सोकसल्लसमप्पितो।
अथोऽपि एवं-चित्तस्स झाने न ग्मती मनो।।१०।।

मराठीत अनुवाद :-

९८१. त्याला पाहून बावरीनें आसनावर बसावयास सांगितलें, व त्याचें सुख आणि कुशल विचारलें, आणि तो म्हणाला— (६)

९८२ जें काहीं मजपाशीं देण्याजोगें होतें तें सर्व मीं देऊन टाकलें आहे. हे ब्राह्मणा, मजपाशीं आतां पांचशें (कार्षापण) नाहींत हें माझें म्हणणें (विश्वास ठेवून) तूं मान्य कर. (७)

९८३ (ब्राह्मण--) “याचना केली असतां जर भवान् (तू) मला देणार नाहींस, तर सातव्या दिवशीं तुझ्या डोक्याचे सात तुकडे होवोत.” (८)

९८४ आपलें सामान गोळा करून१ (१ ‘मंत्र-तंत्राचें ढोंग करून’ असा अर्थ टीकाकारानें दिला आहे.) त्या दांभिकानें असा भयंकर शाप दिला. त्याचें तें वचन ऐकून बावरि दु:खित झाला. (९)

९८५ तो शोकशल्यानें विद्ध होऊन उपवासांनीं वाळत चालला आणि त्या विचारानें त्याचें चित्त ध्यानसमाधीकडे लागेना. (१०)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel