पाली भाषेतः-
६६१ अभूकवादी निरयं उपेति। यो वाऽपि कत्वा न करोमी ति चाह्व।
उभोऽपि ते पच्च समा भवन्ति। निहीनकम्मा मनुजा परत्थ।।५।।
६६२ यो अप्पदुट्ठस्स नरस्स दुस्सति। सुद्धस्स पोसस्स अनंगणस्स।
तमेव बालं पच्चेति पापं। सुखुमो रजो पटिवातं व खित्तो।।६।।
६६३ यो लोभगुणे अनुयुत्तो। सो वचसा परिभासति अञ्ञे।
अस्सद्धो कदरियो अवदञ्ञू। मच्छरि पेसुणियस्मिं अनुयुतो।।७।।
६६४ मुखदुग्ग विभूतमनरिय। भूनहु पापक दुक्कतकारि।
पुरिसन्तकलि अवजात। मा बहु भाणि घ नेरयिकोऽसि।।८।।
मराठी आनुवादः-
६६१. न घडलेली गोष्ट घडली असें म्हणणारा व आपण कृत्य करून तें केलें नाहीं असें म्हणणारा दोघेही नरकाला जातात. तीं दोघेही हीनकर्मी माणसें मरणोत्तर परलोकी एकच गति पावतात.(५)
६६२. निर्दोषी, शुद्ध आणि निष्पाप माणसाला जो दोष देतो, त्याच्यावर तें पापकृत्य वार्यावर फेंकलेल्या सूक्ष्म धुळीप्रमाणें उलटतें.(६)
६६३. लोभांत बद्ध झालेला, श्रद्धाविहीन, कृपण, अवदाव्य१ [१. ३१ व्या सुत्तांतील पहिली(४७८ गाथेवरील) टीप पहा.] मत्सरी आणि चहाडी करण्यांत गुंतलेला असा जो, तो आपल्या वाणीनें इतरांना दोष लावतो.(७)
६६४. हे विषममुखा, असत्यावादी, अनार्या, भ्रूणहा, पाप्या, दुष्कृत्यकारी, पुरुषाधमा, कली, नीचा, येथें जास्त बोलूं नकोस; नरकगामी आहेस.(८)
पाली भाषेतः-
६६५ रजमाकिरसि अहिताय। सन्तं गरहलि किब्बिसकारि।
बहूनि च दुच्चरितानि चरित्वा। गञ्छिसि१(१ म.-गच्छसि.) खो पपतं चिररत्तं।।९।।
६६६ न हि नस्सति कस्सचि कम्मं। एति ह२ नं३ लभते व सुवामि।(२ म.-पततिं, अ.-‘पपटं, पपदं’ ति पि.) (३ म.-हनं, अ.-ह तं; अथवा हतं.)
दुक्खं मन्दो परलोके। अत्तनि पस्सति किब्बिसकारी।।१०।।
६६७ अयोसंकुसमाहतट्ठानं। तिण्हधारं अयसूलमुपेति।
अथ तत्त४अयोगुळसन्निभं। भोजनमत्थि तथा पतिरूपं।।११।।(४ म.-तत्थ.)
मराठी अनुवादः-
६६५ हे कल्मषकार्या, तूं संतांची निंदा करतोस, व आपल्या अहितासाठीं धूळ फेंकतोस, पुष्कळ कुकर्मे करून तूं खड्ड्यांत जाण्याकरितां चिरकालपर्यंत एकसारखा पडत राहशील१.[१ इतक्या खोल नरकांत जाणार आहेस कीं, तेथें जाण्याकरितांच तुला चिरकालपर्यंत खालीं पडत जावें लागेल. टीकाकार (कड्यावरून खालीं असणारा) खड्डा असा अर्थ घेतो.] (९)
६६६ कारण, केलेलें कर्म फळ दिल्यावांचून नष्ट होत नाहीं. तें कर्त्याच्या मागें लागतें. कर्ता त्याचें फळ भोगतोच. तो कल्मषकारी मन्दबुद्धि स्वत: परलोकीं दु:ख अनुभवितो.(१०)
६६७ (पायांना बोंचणारें) लोखंडी खिळे मारून तयार केलेल्या जमिनीवर व तीक्ष्ण धारेच्या लोखंडी सुळावर तो जातो, आणि त्याला तेथें योग्य असें तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यासारखें भोजन मिळतें.(११)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.