पाली भाषेत :-
४७
[९. मागन्दियसुत्तं]
८३५ दिस्वान तण्हं १अरतिं १रगं(१-१ म.-अरती च रागं. नि.-अरतिं च रागं.) च। नाहोसि छन्दो अपि मेथुनस्मिं।किमेविदं मुत्तकरीसपुण्णं। पादाऽपि नं संफुसितुं न इच्छे।।१।।
८३६ एतादिसं चे रतनं न इच्छसि। नारिं नरिन्देहि बहूहि पत्थितं।
२दिट्ठिगतं(२ Fsb.-दिट्ठी.) सीलवतानुजीवितं। भवूपपात्तिं च वदेसि कीदिसं।।२।।
मराठीत अनुवाद :-
[९. मागन्दियसुत्त]
८३५. (भगवान्-) तृष्णा, अरति आणि रगा (रति) या तीन मारकन्यांना१(१ या तीन मारकन्या बुद्धाला मोह पाडण्यासाठीं आल्या अशी कथा संयुत्तनिकायाच्या सगाथावग्गांत आहे. मागन्दिय ब्राह्मणानें आपली कन्या बुद्धास अर्पण करण्यासाठीं आणली. त्या प्रसंगीं बुद्धानें ही गाथा म्हटली असें अट्ठकथेंत सांगितलें आहे.) पाहून देखील स्त्रीसंगाचा विचार मनांत आला नाहीं. केवळ मूत्रकरोषानें भरलेलें स्त्रीशरीर आहे. त्याला पायानेंही मी स्पर्श करूं इच्छीत नाहीं.(१)
८३६ (मागन्दिय-) अनेक राजांनीं प्रार्थिलेलें असें हें स्त्री-रत्न जर तूं इच्छीत नाहींस, तर अशी तुझी दृष्टि, शील, व्रत व उपजीविका कोणती? आणि तुझा परलोक कशा प्रकारचा म्हणतोस?(२)
पाली भाषेतः-
८३७ इदं वदामी ति न तस्स होति (मागन्दिया ति भगवा) धम्मेसु निच्छेय्य समुग्गहीत।
पस्सं च दिट्ठीसु अनुग्गहाय। अज्झत्तसन्तिं१(१ सी., म.-अज्झत्तं सन्तिं (गाथा ९१९ पहा)) २पचिनं(२ म.-पविचिनं.) अदस्स३(३ म.-अद्दसं.)।।३।।
८३८ विनिच्छया४ ४यानि(४-४ म.-विनच्छयानि.) पकप्पितानि (इति मागन्दियो। ते वे५(५ सी.-चे.) मुनि६(६ Fsb.-मुनी.) ब्रूसि अनुग्गहाय।
अज्झत्तसन्ती ति यमेतमत्थं। कथं नु धीरेहि पवेदितं तं।।४।।
८३९ न दिट्ठिया न सुतिया न ञाणेन (मागन्दिया ति भगवा)। सीलब्बतेनापि न७ ७सुद्धिमाह।(७-७ म.-विसुद्धि, सी.-माहा.)
अदिट्ठिया अस्सुतिया८(८ म., अ.- असुतिया.) अञ्ञाणा९(९ Fsb.-अञाणा.)। असीलता अब्बता नोऽपि तेन
एते च१० (१० म. –न.) निस्सज्ज११ (११ म.-निसज्ज.)
अनुग्गहाय। सन्तो अनिस्साय भवं न जप्पे।।५।।
मराठी अनुवादः-
८३७. त्या मला-हे मागन्दिया, असें भगवान् म्हणाला- धर्मपंथांत नीट विचार करून, एकादी दृष्टि पकडून, ‘ही माझी’ असें म्हणावेसें वाटत नाहीं. या ज्या दृष्टि त्या पकडण्याला योग्य नव्हेत असें जाणून व विचार करून मीं अध्यात्म-शान्ति मिळविली.(३)
८३८ जीं विकल्पिलेलीं निश्चित मतें आहंत-असें मागन्दिय म्हणाला-तीं, हे मुनि, पकडण्याला योग्य नव्हत असें तूं म्हणतोस, तर मग ही जी अध्यात्म-शान्ति, ती सुज्ञांनीं कशी वर्णिलेली आहे? (४)
८३९ दृष्टीनें, श्रुतीनें आणि ज्ञानानें-हे मागन्दिया, असें भगवान् म्हणाला-किंवा शीलानें आणि व्रतानें शुद्धि नाहीं. अदृष्टीनें अश्रुतीनें, अज्ञानानें, अशीलानें आणि अव्रतानेंही शुद्धि नाहीं; हे सर्व पंथ पकडण्यास योग्य नाहींत म्हणून ते सोडून, अनासक्त, शान्त माणसानें भव प्राप्त करून घेण्याकरितां काकुळतीस येऊं नये. (५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.