पाली भाषेत :-

२४५ कोधो मदो थम्भो पच्चुट्ठापना च। माया उसूया१ ( १ रो.,म.-उस्सुया.) भस्ससमुस्सयो च।
मानातिमानो च असब्भि सन्थवो। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।७।।

२४६ ये पापसीला इणघातसूचका। वोहारकूटा इध पाटिरूपिका।
नराधमा ये ध करोन्ति किब्बिसं। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।८।।

२४७ ये इध पाणेसु असञ्ञता जना। परेसमादाय विहेसमुय्युता।
दुस्सीललुद्दा फरुसा अनादरा। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।९।।

२४८ एतेसु गिद्धा विरुद्धातिपातिनो। निच्चुय्युता पेच्च तमं वजन्ति ये।
पतन्ति सत्ता निरयं अवंसिरा। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।१०।।

मराठीत अनुवाद :-

२४५. क्रोध, मद, कठोरता, विरोध, माया, ईर्ष्या, वृथा बडबड, मानातिमान, आणि खळांची संगति-- हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे. (७)

२४६ जे पापी, ऋण बुडविणारे, सूचकशब्दांनीं कुचेष्टा करणारे, बाहेरून खर्‍याचा आव आणणारे पण (लांच खाण्यासारखा) खोटा व्यवहार करणारे (अधिकारी), जे नराधम इहलोकीं किल्मिष उत्पन्न करतात, (अशांचें कर्म)—हा आमगन्ध होय; मांसभोजन हा नव्हे. (८)

२४७ ज्यांना प्राण्यांविषयीं दया नाहीं, जे इतरांना लुटून
उपद्रव देतात, दु:शील, भेसूर, शिवीगाळ देणारे व अनादर करणारे, (अशांचें कर्म)—हा आमगन्ध होय; मांसभोजन हा नव्हे. (९)

२४८ अशा कर्मांत आसक्त झालेले, विरोध करणारे, घात करणारे, सदोदित अशा कर्मांत गुन्तलेले, जे परलोकीं अन्धकारांत शिरतात व वर पाय खालीं डोकें होऊन नरकांत पडतात, (अशांचें कर्म)—हा आमगन्ध होय; मांसभोजन हा नव्हे. (१०)

पाली भाषेत :-

२४९ न मच्छमंसाननासकत्तं१(१ रो.- न मच्छमसं ननासकत्तं; सी.-न मच्छमंसं नानासकत्तं.)
न नग्गियं (मुण्डियं जटा)। जल्लं खराजिनानि वा।
नाग्गिहुत्तस्सुपसेवना२(२ म.-अग्गिहुत्तस्सुपसेवना.) वा। ये वाऽपि लोके अमरा बहू तपा।
मन्ताहुती३(३ म.-मन्ताहुति.) यञ्ञमुतूपसेवना। सोघेन्ति मच्चं अवितिण्णकंखं।।११।।

२५० सोतेसु गुत्तो विदितिन्द्रियो४(४ रो.-विजितिन्द्रियो.) चरे। धम्मे ठितो अज्जवमद्दवे रतो।
संगातिगो सब्बदुक्खप्पहीनो। न लिप्पती५(५ म.-लिम्पति.) दिट्ठिसुतेसु धीरो।।१२।।

२५१ इच्चेचमत्थं भगवा पुनप्पुनं। अक्खसि तं६(६ म.-नं) वेदयि मन्तपारगू।
चित्राहि गाथाहि मुनिप्पकासयि। निरामगन्धो असितो दुरन्नयो।।१३।।

२५२ सुत्वान बुद्धस्स सुभासितं पदं। निरामगन्धं सब्बदुक्खप्पनूदनं।
नीचमनो वन्दि तथागतस्स। तत्थेव पब्बज्जमरोचयित्था ति।।१४।।

आमगन्धसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

२४९. मत्स्यमांसाचा आहार वर्ज्य करणें, नागवेपणा, मुंडन, जटा, राख फांसणें, खरखरीत अजिनचर्म, अग्निहोत्राची उपासना किंवा इहलोकींच्या अमरादि१ (१ एकप्रकारचें तप.) विविध तपश्चर्या, मन्त्राहुति, यज्ञ आणि शीतोष्णसेवनानें तप करणें—ह्या गोष्टी कुशंकांच्या पार न गेलेल्या मर्त्याला पावन करूं शकत नाहींत. (११)

२५०. इन्द्रियांत संयम ठेवून व इन्द्रियें जाणून वागणारा, धर्मस्थित, आर्जव व मार्दव यांत संतोष मानणारा, संगातीत व ज्याचें सर्व दु:ख नाश पावलें असा जो धीर पुरुष तो ‘दृष्ट२’(२ पुढें ७७८, ८१२-८१३ आदि गाथा पहा.) आणि ‘श्रुत३’ (३ अट्ठकथाकारांच्या मतें अन्य सांप्रदायिकांकडून ‘दुर्नेय.’) अशा संबंधीच्या (मिथ्या-) दृष्टीमध्यें बद्ध होत नाहीं. (१२)

२५१. हा अर्थ भगवन्तानें पुन: पुन: प्रकाशित केला आणि त्या मन्त्रपारगानें (ब्राह्मण तापसानें) तो जाणला. हा अर्थ त्या निरामगन्ध, अनासक्त आणि दुरन्वय अशा मुनीनें रम्य गाथांनीं प्रकाशित केला. (१३)

२५२. निरामगन्ध आणि सर्व दु:खांचा नाश करणारें असें बुद्धाचें सुभाषित वचन ऐकून तो (ब्राह्मण) नम्रपणें तथागताच्या पायां पडला आणि त्यानें तेथल्या तेथेंच प्रव्रज्या घेण्याची आपली उत्सुकता प्रकट केली. (१४)

आमगन्धसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel