पुण्याची स्थिती इतर शहरांहून फार निराळी. पुणे ही पेशव्यांची राजधानी. ब्राह्मण्याची पुणे ही आश्रयभूमी.  जुन्या परंपरेचे, जुन्या चालीचे, जुन्या धर्मकल्पनांचे भोक्ते येथील बहुतेक लोक. या जुन्या परंपरेतील लोकांचे असे मत पडले की, जर सामाजिक परिषद ही राष्ट्रीय सभेच्याच मंडपात भरेल तर सर्व राष्ट्रीय सभावाले सामाजिक परिषदेच्या मताचेच आहेत असे जगजाहीर होईल. 'परंतु आम्हांस राजकीय अधिकार पाहिजे आहेत. आमची राजकीय सुधारणा झाली पाहिजे, धार्मिक सुधारणेत लुडबुडण्याचे, जुन्या थोर पूर्वजांनी घालून दिलेल्या धर्मांच्या बाबतीत अमुक सुधारणा करा, तमूक सुधारणा करा अशी हुल्लड उठविणारे आणि मनुयाज्ञवल्क्यांच्या पदवीस झोंबू पाहणारे जे लोक आहेत. त्यांच्याशी आम्हांस काही एक कर्तव्य नाही; त्यांचा आमचा या विचारात काडीचा संबंध नाही असे जगजाहीर करण्यासाठी दोन्ही सभा निरनिराळया ठिकाणी भरवा.' असे या जुन्या पक्षाच्या लोकांचे म्हणणे पडले. 'आम्ही राष्ट्रीय सभेच्या कार्यासाठी वर्गणी देऊ, सामाजिक परिषदेबद्दल आमची सहानुभूती यत्किंचितही नाही' असे हा वर्ग स्पष्टपणे आहे. याच्या उलट दुसरा सुधारकी पक्ष असे म्हणू लागला की जर सामाजिक परिषद राष्ट्रीय सभेच्या मंडपात भरू देणार असाल तरच आम्ही वर्गणी देऊ, नाही तर साफ देणार नाही. खरे पाहिले तर राष्ट्रीय सभा सामाजिक परिषदेपेक्षा महत्त्वाची. दोन्ही गोष्टी निरनिराळया होत्या. म्हणूनच दोहींची अधिवेशने निरनिराळी भरत. तेव्हा केवळ राष्ट्रीय सभेसाठीच असेल तर आम्ही वर्गणी देणार नाही असे म्हणणा-यांवर टिळक यांनी काँग्रेसचे द्रोही असा आरोप ठेविला तो रास्तच होता. जेव्हा टिळकांनी सुधारकी व अतएव सुशिक्षित समजल्या जाणा-या या चमूचे  हे मतकृपणत्व पाहिले तेव्हा त्यांनी जुन्या मताच्या लोकांस उचलून धरले. वास्तविक वैयक्तिक दृष्टया टिळक भांडले नसते. सामाजिक परिषद कोठेही भरवा; त्याबद्दल त्यांनी येवढा विरोध केला नसता. परंतु आपलेच म्हणणे धरून एका प्रामाणिक पक्षाला धुडकावून लावू पाहणारा हा जो सुधारकी मेळा त्याचा त्यांचा फार राग आला. राष्ट्रीय सभेस सुधारक पाहिजेत तसे जुन्या परंपरेचे लोकहि पाहिजेत. तिच्यासाठी सर्वांनी आधी धावून गेले  पाहिजे.  असे असता सामाजिक परिषदेबद्दलचा कांगावा करून राष्ट्रीय सभेवर रुसणा-या या सुधारणावाद्यांच्या सोंगावर टिळकांनी कोरडे ओढले. राष्ट्रीय सभा सर्व मतांच्या लोकांची आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. परंतु काँग्रेसची सूत्रे सुधारक पक्षाच्या हातांत; रानडे, गोखले, मुंबईचे मेथा, वाच्छा वगैरे लोक सर्व सुधारक. आपलेच म्हणणे धरून बसणारे हे लोक. रानडयांनी या वेळेस सावध होऊन राष्ट्रीय सभेच्या मतैक्यासाठी हा प्रश्न सोडविण्यास लागले पाहिजे होते. परंतु रानडयांनी काही एक केले नाही. गोष्टी कोणत्या थरावर जातात याचीच ते वाट पहात बसते. टिळकांनी सेक्रेटरीशीपचा राजीनामा दिला. तेव्हा या बिरुद पक्षाच्या    लोकांस संशय वाटला. टिळकपक्षाचे लोक काँग्रेसच्या मंडपात आगसुध्दा लावण्यास मागेपुढे पाहणार नाहीत अशी कंडी उठली, ती या लोकांनीच उठविली असली पाहिजे. गोखले पडले भोळे. त्यांना ही हूल खरी वाटली आणि उतावीळपणाने त्यांनी वाच्छांस तार केली की असे असे आहे तरी ताबडतोब या. जणू वाच्छा येऊन शहनिशी करणार होते! वाच्छास स्टेशनवर पुष्कळ मंडळी सामोरी गेली आणि वाच्छांस ' हे सर्व खोटे आहे; आपण का येण्याची तसदी घेतली? असे प्रश्न लोकांनी विचारले.  वाच्छांस गोपाळरावांतच्या उतावीळपणाची कल्पना आली.'

शेवटी हा मंडपाचा वाद नियोजित अध्यक्ष सुरेंद्रनाथ बानर्जी यांच्या कानांवर गेला. त्यांनी असे कळविले की, जर पुण्याच्या लोकांचे एकमेत होत नसेल तर आपण अध्यक्ष होण्यास तयार नाही. धोंडा  बरोबर लागला. रानडे जागे झाले. जी गोष्ट आधीच झाली पाहिजे होती. ती दिरंगाईवर व 'पाहू या काय होते ते' अशावल टाकण्यात आली होती.  परंतु सोनाराने परसपर कन टोचले म्हणजे परंतु सभा नीटपणे पार पडली आणि दंग्याधो-याची भीती अवास्तव ठरली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel