"He was one of those men who appear, from time to time in different countries and on different occasions, to serve as a light to guide the footsteps of our weak and erring humanity. He was a man with  a mission in life- the preacher of a new gospel, one who imparted a new impulse to our thoughts and breathed a new hope into our hearts.  A great and a massive intellect, a heart that overflowed with the love of his country, an earnest and dauntless spirit, an infinite capacity for work, patience inexhaustible and an humble faith in the purpose of Providence that nothing shook- and a man so equipped could worthily undertake the task of moulding the thoughts, hopes and aspirations of his countrymen.  The grandeur and nobility of his soul impressed itself on all who came in any kind of contact with him; men were afraid to think unworthy thoughts before him; they felt themselves to be in an atmosphere of holiness, of love and of service- they felt as though they were in the presence of a being of higher order.  Well, gentlemen, such men are among the chosen instruments of God to work out His beneficent purpose.''

वरील भक्तीपूर्ण उध्दारांवरून रानड्यांकडे गोपाळराव कोणत्या दृष्टीने पाहत असत हे दिसून येईल. या साध्या व सरळ भाषणात गोखल्यांचे हृदय ओतले आहे.

१९०४ च्या बजेटवरील भाषणात त्या वर्षी लष्काराकरिता वाढविण्यात येणा-या खर्चावर त्यांनी टीका केली. सेनापतिसाहेबांनी हिंदुस्तानातील आंग्लपुत्रांना सैन्यात दाखल होण्यास आग्रहाने सांगितले. परंतु, हिंदू लोकांस मात्र मज्जाव? 'May not the Government consider the desirability of permitting- aye, inviting- carefully selected classed from among the children of the soil to share in the responsibilities of national defence?' परंतु राष्ट्र दुर्बल करण्याचेच ज्यांचे व्रत ते सरकारी अधिकारी या गोष्टीकडे लक्ष कसे देणार? सुशिक्षित लोकांस तर लष्कर म्हणजे वावडेच. लष्करात घ्यावयाचे झालेच तर ज्यांस देशाची अगर स्वाभिमानाची चाड नाही, ज्यांची नेम सुसंस्कृत नाहीत अशा सरकारी सांगेल त्याच्यावर गोळी झाडणा-या आडमुठ्या लोकांस सरकार लष्करात घेणार.

१९०४ सालच्या काँग्रेसचे गोखले हे जॉइंट सेक्रेटरी होते. या वर्षीची राष्ट्रीय सभा मद्रासला भरावयाची होती. या सभेत गोखल्यांनी हिंदुस्तान सरकारच्या खजिन्यात सहा वर्षांत जी तीस कोट रुपये शिल्लक पडली, त्या शिलकेच्या उपयोगासंबंधी ठराव मांडला. सरकारने लोकांपासून मिळविलेल्या या लुटीवर त्यांनी कौन्सिलमध्ये तर वेळोवेळी तडाखे दिलेच होते. या पैशांतून निरनिराळया शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास युनिव्हर्सिटीतून व्हावा म्हणून देणग्या द्याव्या असे लॉर्ड कर्झन साहेबांस सुचविले होते. परंतु कर्झन साहेबांचा कुर्रा कोणास माहीत नाही? सरकारच्या ताब्यात युनिव्हर्सिटी देण्याविरुध्द जर ओरडता तर मग सरकारच्या तिजोरीवर तरी लक्ष का असे हे विद्वान लॉर्ड साहेब उद्गारतात.  Lord Curzon said (refering to Gokhle's observation), ``Exactly. But will the Hon. member tell me, why? There is plenty of money among his own people. Then Why does he not money which is needed for instituting University Chairs?'' जणू काय सरकारने गलबते भरभरून कोळशाच्या माहेरघराहून पैसा आणला! लोकांजवळचा पैसा लुटून पुन: त्या पैशांचा उपयोग सरकारच्या नवीन नवीन जावईखात्यात करावयाचा आणि शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे यासाठी भांडवल मागितले तर लोक श्रीमंत आहेत हे उत्तर? दादाभाई, रानडे या सर्वांची आकडेमोड करून जे सिध्द केले ते कर्झन साहेबांच्या ब्रह्मवाक्यामुळे काहीच नाही काय? ज्या परिस्थितीत नवीन कायदे केले ती परिस्थिती पालटली तरी कायदे  काही चुकत नाहीत. गोपाळराव विचारतात, 'What  right has the Government  to retain taxation at the level  to which it was forced by successive additions, now that the need for such a high level has passed away?' या व्याख्यानात गोपाळरावांनी असल्या आर्थिक प्रश्नांवर जबाबदारपणे बोलण्याचा आपणास थोडाफार अधिकार आहे असे सांगितले. या गोष्टीत अभिमान नव्हता तर यथार्थता  होती. ते म्हणतात, 'Gentlemen, it was more than sixteen years ago that I first imbibed a love for the study of financial  questions at the feet of my great master, Mr. Ranade, and since then, I may claim to have been a fairly close student of Indian finance.' आधीच बेजबाबदारपणे अधिकार गाजविणारे सरकार हातात पैसा खुळखुळू लागताच जास्तच बेजबाबदारपणे वागू लागेल. ''This plethora of money at the disposal of the Government makes an irresponsible administration still more irresponsible.'' या शिलकी पैशामधून वरिष्ठ सरकार प्रांतिक सरकारास उधळपट्टी करावयास मदत करिते, कधीकधी शिष्टमंडळे पाठविण्यात, तर कधी अवाढव्य लष्करी खर्च वाढविण्यात या पैशाचा दुरुपयोग होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel