प्रकरण ३ रW
कॅथॉलिक पंथी बंडखोर : अ‍ॅसिसीचा साधु फ्रॅन्सिस
- १ -

नऊ रक्ताळ क्रूसेड्स् झालीं.  त्यांत भर म्हणून सेंट फ्रॅन्सिसचें रक्तहीन दहावें क्रूसेडहि झालें.  मुसलमानांनाच नव्हे तर ख्रिश्चनांनाहि खर्‍या ख्रिस्ती धर्माकडे वळविण्यासाठीं सेंट फ्रॅन्सिस जीवनभर धडपडला.  तो प्रभूचा खरा भक्त होता, प्रभुसंदेश गाणारा सौम्यमूर्ति संत होता.  त्यानें सारें जीवन प्रेमानें धर्मप्रसार करण्यांत घालविलें ; पण त्या प्रयत्नांत त्याला फारसें यश आलें नाहीं.

सेंट फ्रॅन्सिसचें पूर्ण नांव फ्रॅन्सिस्को बर्नार्डोनो.  तो इटॅलियन होता.  ख्रिस्ताच्या जीवनाचें अनुकरण करावें अशी त्याला इच्छा होती.  पण खरोखर तो बुध्दाच्या जीवनाप्रमाणें जगला.  बुध्दाचें नांवहि त्यानें कधीं ऐकलें नसेल.  पण बुध्दाचेंच जीवन न कळत का होईना, त्याच्या डोळ्यांसमोर होतें.  बुध्दाच्या जीवनांतील प्रसंगांशीं सेंट फ्रॅन्सिसच्या जीवनांतील प्रसंगांचें आश्चर्यकारक साम्य आहे.  दारिद्र्याशीं समरस होण्यासाठीं दोघांनींहि आपापलें वैभव झुगारून दिलें ! दोघेहि खासगी मालमत्ता म्हणजे पाप-पापांचें मूळ असें समजतात.  मानवांच्या कपाळावरील दु:खांच्या रेखा पुसून टाकण्यासाठीं दोघेहि आमरण परिव्राजक होऊन भटकत राहिले.  दोघांनींहि जीवनांतील सौंदर्य व करुणा हीं नीट जाणलीं होतीं.  अखिल मानवजातीच्या चालू असलेल्या अफाट सहानुभूतीच्या संगीतांतला आपण केवळ एक सूर आहों, फक्त एक अंश आहों असें त्या दोघांसहि वाटे.  दोघेहि मरणप्रसंगीं आपल्या मित्रांस म्हणाले, ''आम्हांला जमिनीवर निजवा.''  संसारांतील वस्तूंचें ओझें त्यांना नको होतें.  त्यांचा स्पर्श त्यांना पापमय वाटे. ''नको हा संग्रह, नकोत या भौतिक चिजा !'' असें ते म्हणत.

- २ -

फ्रॅन्सिस हा पिएट्रो बर्नार्डोचा मुलगा.  पिएट्रो हा सुखवस्तु कापडाचा व्यापारी होता.  फ्रॅन्सिस उधळ्या, बंडखोर व भावनाप्रधान होता ; तो एकदम उसळे, उफाळे.  तथापि तो अत्यंत उदार होता.  त्याला पैशाची किंमत कळत नसे.  पैसा देण्यासाठीं असतो, असेंच जणूं त्याला वाटे.  डाव्याउजव्या हातांनीं तो बेसुमार पैसे खर्ची, पण स्वत:साठीं नव्हे तर दुसर्‍यांच्या सुखासाठीं.  पित्याच्या पेटींत पैसा उगाच पडून राहण्यापेक्षां मित्रांना आनंद देण्यासाठीं त्याचा उपयोग व्हावा हें त्याला पसंत पडे.  त्याचा बाप काटकसरी होता, आईहि जपून खर्च करणारी होती.  ती म्हणे, ''फ्रॅन्सिस जसा कांहीं राजाच्या मुलासारखा वागतो ! आपण एका इटॅलियन दुकानदाराचा मुलगा आहों हें जणूं त्याच्या ध्यानींहि नसतें !'' आई फ्रॅन्सिसबाबत थोडें प्रेमानें बोले ; पण बापानें त्याच्याविषयीं आशाच सोडली होती.  फ्रॅन्सिस कधीं काळीं सुधारेल याची त्याला मुळींच शक्यता वाटत नसे.

आईबाप फ्रॅन्सिसवर नाराज असले तरी अ‍ॅसिसीचे सारे तरुण मात्र त्याला जीव कीं प्राण करीत.  तो पैशाची किंवा स्वत:च्या प्राणाचीहि पर्वा करीत नसे.  तो हाडकुळा होता ; त्याचे डोळे काळेभोर व तेजस्वी होते.  तो नेहमीं आनंदी व उल्हासी असे.  तो तरुणांचा खेळांतला नेता-म्होरक्या-असे.  तरुणांच्या फॅशन्स, त्यांच्या खोड्या, त्यांचे प्रेम-प्रकार या सर्वांत तो पुढें असे.  तरुण टॉल्स्टॉयप्रमाणें, यौवनारुढ बुध्दाप्रमाणें त्यालाहि त्याचे मित्र ''खरा सवंगडी, जानी दोस्त'' असें म्हणत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय