प्रकरण चवथे
गोतम बोधिसत्त्व
गोतमाची जन्मतिथि


गोतमाच्या जन्मतिथीसंबंधाने अर्थाचीन पंडितात बराच मतभेद आढळतो. दिवाण बहादूर स्वामीकन्नू पिल्ले यांच्या मते बुद्धाचे परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ४७८ व्या वर्षी झाले. इतर काही पंडितांचे म्हणणे की, ते ख्रिस्तापूर्वी ४८६-८७ च्या वर्षी घडले. पण आजकाल लागलेल्या नवीन शोधावरून महावंस आणि दीपवंस यात दिलेली बुद्धपरिनिर्वाची तिथिच योग्य ठरते.* (*The Early History of India by V. A. Smith, (Oxford १९२३), p ४९-५०.) या ग्रंथावरून बुद्धाचे परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ५४३ व्या वर्षी झाले असे सिद्ध होते. आणि बुद्धपरिनिर्वाणाची ही तिथि गृहीत धरली तर बुद्धाचा जन्म ख्रिस्तापूर्वी ६२३ व्या वर्षी झाला असे म्हणावे लागते.

बोधिसत्त्व

गोतमच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन आहे. पालि वाङमयांत सगळ्यात प्राचीन जो सुत्तनिपात त्यात म्हटले आहे की,

सी बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो।
मनुस्सलोके हुतसुखतय जातो।
सक्यानं गामे जनपदे लुम्बिनेय्ये।

श्रेष्ठ रत्नाप्रमाणे अतुलनीय असा जो बोधिसत्त्व लुम्बिनी जनपंदात शाक्यांच्या गावी मानवाच्या हितसुखासाठी जन्मला.
बोधि म्हणजे मनुष्याच्या उद्धाराचे ज्ञान आणि त्यासाठी प्रयत्न करणारा जो प्राणि (सत्व) तो बोधिसत्त्व होय. आरंभी गोतमाच्या जन्मापासून त्याला संबोधिज्ञान होईपर्यंत हे विशेषण लावीत असावे. होता होता त्याने त्या जन्मापूर्वी दुसरे अनेक जन्म घेतले अशी कल्पना प्रचलित झाली, आणि त्या पूर्व जन्मात देखील त्याला बोधिसत्त्व हे विशेषण लावण्यात येऊ लागले. त्याच्या पूर्वजन्मीच्या कथांचा संग्रह जातकात केला आहे.

त्या गोष्टींमध्ये जे कोणी मुख्य पात्र असेल, त्याला बोधिसत्त्व ही संज्ञा लावून तो पूर्वजन्मीचा गोतमच होता असे म्हटले आहे. ज्या कथेत योग्य पात्र सापडले नाही, तेथे बोधिसत्त्वाचा कथेशी विशेष संबंध नसलेल्या एखादया वनदेवतेचे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीचे स्वरूप देऊन कसा तरी संबंध जुळवून आणला आहे. अस्तु. येथे गोतमाच्या जन्मापासूनच बुद्धत्त्वापर्यंत त्या बोधिसत्त्व या नावाने संबोधावयाचे आहे, त्याच्या पूर्वजन्माशी या विशेषणाचा काही संबंध नाही, असे समजावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल