अक्रियवाद व संसारशुद्धिवाद

या अक्रियवादापासून मक्खलि गोसालाचा संसारशुद्धिवाद फार दूर नव्हता. त्याचे म्हणणे असे दिसते की, आत्मा जरी प्रकृतीपासून अलिप्त आहे, तरी त्याला ठरावीक जन्म घ्यावे लागतात आणि त्यानंतर तो आपोआप मुक्त होतो. लक्ष चौर्‍यांशी जन्म घेऊन प्राणी उन्नत दशेला जातो, ही कल्पन अद्यापिही हिंदु समाजात आढळते. मक्खलि गोसालाच्या काळी तो फार प्रचलित होतो, असे दिसते.

काही काळाने पूरण काश्यपाचा संप्रदाय मक्खलि गोसालाच्या आजीवक पन्थांत सामील झाला असे अंगुत्तरनिकायातील छक्कनिपाताच्या का (सं. ५७) सुत्तावरून दिसून येते. त्यात आनंद भगवंताला म्हणतो, “भदत्त पूरण कस्पाने कृष्ण, नील, लोहित, हरिद्र, शुक्ल आणि रमशुक्ल अशा सहा अभिजाति सांगितल्या आहेत. खाटीक, पारधी, वगैरे लोकांचा कृष्णाभिजातीत समावेश होतो. भिक्षु वगैरे कर्मवादी लोकांचा नील जातीत, एक वस्त्र वापरणार्‍या निग्रंन्थांचा लोहिताभिजातीत, सफेत वस्त्र वापरणार्‍या अचेलक श्रावकांचा (जीवकांचा) हरिद्राभिजातीत, जीवकांचा आणि आजीवक भिक्षुणीचा शुक्लाभिजातीत, आणि नन्द वच्छ, किस संकिच्च व मक्खलि गोसाल यांचा परमशक्लाभिजातीत समावेश होतो.”

ह्यावरून पूरण कस्सपाचा संप्रदाय आणि जीवकांचा संप्रदाय एकत्र झाले, असे स्पष्ट दिसते. नंद, वच्छ वगैरे तीन आचार्य आजीवक परंपरेतील पुढारी होते. कस्सपाच्या आणि त्यांच्या आत्मवादांत फरक नव्हता व कस्सपाला त्यांचा देहदंडनचा मार्ग पसंत होता, हेही यावरून सिद्ध आहे.

अजित केसकंबलाचा नास्तिकवाद


अजित केसकंबल पूर्ण नास्तिक होता, हे त्याचा उच्छेदवार पाहिल्याबरोबर लक्षांत येते. सर्वदर्शनसंग्रहांत सापडणार्‍या चार्वाक मताचा ती संस्थापक नसला तरी एक प्रसिद्ध पुरस्कर्ता असावा. त्या ब्राह्मणांचे यज्ञयान असे पसंत नव्हते, तशीच आजीवकटिक श्रमणांची तपश्चर्याही मान्य नव्हती. सर्वदर्शनसंग्रहात म्हटले आहे की,

अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुष्टनम्।
बुद्धिपीरुषहीनानां जीविका धातुनिर्मिता।।

‘अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदण्ड धारण, आणि भस्म लावणे ही ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेली बुद्धिहिन आणि पौरुषहीन पुरुषांची उपजीविका आहे.’ असे असले तरी अजिताची गणनाश्रमणात होत असे. याचे कारण वैदिक हिंसा त्याला मुळीच पसंत नव्हती. आणि जरी तो तपश्चर्या करीत नसला तरी श्रमणांचे आचारविचार पाळीत होता. श्रमणांच्या आत्मवादापासून देखील तो अलिप्त नव्हता. त्याची आत्म्याची कल्पना म्हटली म्हणजे, चार महाभूतांपासून आत्मा उत्पन्न होतो, आणि मेल्यावर तो पुन्हा चार महाभुतांत जाऊन मिसळतो, अशी होती. तेव्हा –

यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मुत्थोरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत्त:।।

‘जिवंत असेपर्यंत सुखाने रहावे; कारण मृत्यूच्या तडाक्यात न सापडणारा प्राणी नाही आणि देहाची राख होऊन गेल्यावर तो परत कोठून येणार?’ असे त्याचे मत असणे साहजिक होते.

ह्या केसकंबलाच्या तत्त्वज्ञानातूनच लोकायत अर्थाशास्त्र निघाले, आणि त्याचा विकास कौटिल्यसारख्या आचार्यांनी केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल