मांसाहाराविषयी प्रसिद्ध जैन साधूंचे मत

गुजरात विद्यापीठाची पुरातत्त्व मंदिर नावाची शाखा होती, तिच्यातर्फे ‘पुरातत्त्व’ त्रमासिक निघत असे. या त्रमासिकाच्या १९२५ सालच्या एका अंकात मी प्रस्तुत प्रकरणाच्या धर्तीवर एक लेख लिहिला आणि त्यात हे दोन उतारे देण्यात आले. मी त्यांच्या स्वत: शोध लावला होता असे नव्हे. मांसाहाराविषयी चर्चा चालली असता प्रसिद्ध जैन पण्डितांनीच ते माझ्या निदर्शनास आणले आणि त्यांचा मी माझ्या लेखात उपयोग केला.

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर अहमदाबादच्या जैन लोकांत फारच खळबळ उडाली. त्यांच्या धर्माचा मी उच्छेद करू पाहतो, अशा अर्थाच्या त्यांच्या तक्रारी पुरातत्त्व मंदिराच्या संचालकांकडे येऊन थडकल्या. संचालकांनी परस्पर त्या तक्रारीचा परिहार केला. मला त्यांची बाधा झाली नाही.

त्या वेळी वयोवृद्ध स्थानकवासी साधु गुलाबचंद व त्यांचे प्रसिद्ध शतावधानी शिष्य रतनचंद अहमदाबादेला राहत असत. एका जैन पंडिताबरोबर मी त्यांच्या दर्शनाला गेलो. संध्यासमय होता व जैन साधु आपणाजवळ दिवा ठेवित नसल्यामुळे ह्या दोन साधूंचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. माझ्याबरोबरच्या जैन पंडिताने रतनचंद स्वामींना माझी ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमची कीर्ती मी ऐकत आहे. परंतु तुम्ही आमचे प्राचीन साधु मांसाहार करीत होते, असे लिहून आमच्या धर्मावर आघात केलात, हे ठीक नव्हे.’’

मी म्हणालो, ‘‘बौद्ध आणि जैन हे दोनच श्रमण संप्रदाय आजला अस्तित्वात राहिले आहेत आणि त्यांजविषयी माझे प्रेम किती आहे, हे या (माझ्याबरोबर असलेल्या) पंडितांनाच विचारा. परंतु संशोधनाच्या बाबतीत श्रद्धा, भक्ति किंवा प्रेम आड येऊ देता कामा नये. सत्यकथनाने कोणत्याही संप्रदायाचे नुकसान होईल, असे मला वाटत नाही आणि सत्यार्थ प्रकाशित करणे संशोधकांचे कर्तव्य आहे, असे मी समजतो.’’

वृद्ध साधु गुलाबचंद काही अंतरावर बसले होते ते तेथूनच आपल्या शिष्याला म्हणाले, ‘‘या गृहस्थाने दोन उतार्‍यांचा जो अर्थ लावला, तोच बरोबर आहे; आधुनिक टीकाकारांनी केलेले अर्थ ठीक नव्हते. ह्या दोन उतार्‍यांशिवाय आण्नी बर्‍याच ठिकाणी, जैन साधु मांसाहार करीत होते, याला आधार सापडतात.’’

असे म्हणून त्यांनी जैन सूत्रांतील उतारे म्हणण्याला सुरुवात केली. पण त्यांच्या विद्वान शिष्यांनी विषयांतर करून हा संवाद तसाच सोडून दिला. त्यांच्या गुरूंनी सांगितलेले आधार कोणते, हे मी विचारले नाही. तसे करणे मला अप्रस्तुत वाटले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल