‘अस्य हि जातमात्रेण मम सर्वार्था: संसिद्धा:। यन्न्वहमस्य सर्वार्थसिद्ध इति नाम र्याम। तो राजा बोधिसत्त्वं महता सत्कारेण सर्वाथंसिद्धोयं कुमारो नाम्ता भवतु इत नामास्याकर्षीत।‘

सर्वार्थसिद्ध हेच व अमरकोशात दिले आहे. पण ललितविस्तरात बोधिसत्त्वाला वारंवार सिद्धार्थकुमार असेही म्हटले आहे आणि त्याचेच ‘सिद्धत्थ’ हे पालि रूपान्तर. सर्वार्थसिद्ध याचे पालि रूपान्तर सव्बत्थसिद्ध असे झाले असते आणि ते चमत्कारिक दिसत असल्यामुळे जातकअट्ठकथाकाराने सिद्धत्थ हेच नाव वापरले असावे. अर्थात सर्वार्थसिद्ध किंवा सिद्धार्थ ही दोन्ही नावे ललितविस्तरकाराच्या अथवा तशाच एखाद्या बुद्धभक्त कवीच्या कल्पनेतून निघाली असली पाहिजेत.

बोधिसत्त्वाचे खरे नाव गोतम होते यात शंका नाही. थेरीगाथेत महाप्रजापती गोतमीच्या ज्या गाथा आहेत त्यापैकी एक ही –

बहूनं वत अत्थाय माया जनयि गोतमं।
व्याधिमरणतुन्नानं दुक्खक्खन्धं व्यापानुदि।।

‘पुष्कळांच्या कल्याणासाठी मायेने गोतमाला जन्म दिला व्याधि आणि मरण ह्यांनी पीडित झालेल्या जनांचा दु:खराशि त्याने नष्ट केला.’ परंतु महापदानसुत्ता बुद्धाला ‘गोतमी गोत्तेन’ असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे अपदानग्रंथात अनेक ठिकाणी ‘गोतमी नाम नामेन’ आणि ‘गोतमी नाम गोत्तेन’ असे दोन प्रकारचे उल्लेख सापडतात. त्यावरून बोधिसत्त्वाचे नाव आणि गोत्र एकच होते की काय असा संशय येतो. पण सुत्तनिपातातील खालील गाथांवरून तो दूर होण्याजोगा आहे.

उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो।
धनविरियेन संपन्नो कोसलेसु निकेतिनो।।
आदिच्चा नाम होत्तेन साकिया नाम जातिया।
तम्हा कुला पब्भजितोम्हि राज न कामे अभिपत्थयं।।
(पब्बज्जसुत्त, गा. १८-१९)

(बोधिसत्त्व बिंबिसार राजाला म्हणतो, हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी एक धनाने आणि शौर्याने संपन्न असा प्रदेश आहे. कोसल राष्ट्रात त्याचा समावेश होतो. तेथल्या लोकांचे गोत्र आदित्य असून त्यांना शाक्य म्हणतात. त्या कुळातून मी परिव्राजक झालो तो हे राजा कामोपभोगांच्या इच्छेने नव्हे.

या गाथांत शाक्यांचे गोत्र आदित्य होते असे म्हटले आहे. एकाच काळी आदित्य आणि गोतम ही दोन गोत्रे असणे शक्य दिसत नाही. सुत्तनिपात प्राचीतम असल्यामुळे आदित्य हेच शाक्यांचे खरे गोत्र असावे. वर दिलेल्या अमरकोशाच्या श्लोकात अर्कबंधु हे जे बुद्धाचे नाव, ते त्याचे गोत्रनाव आहे असे समजले पाहिजे. कारण ते ‘आदिच्चा नाम गोतेम” या वाक्याशी चांगले जुळते. बोधिसत्त्वाचे खरे नाव गोतम होते व तो बुद्धपदाला पावल्यावर त्याच नावाने प्रसिद्धीला आला. ‘समणो खलु भो गोतमी सक्यकुलापब्बजितो’ अशा प्रकारचे उल्लेख सुत्तपिटकात किती तरी ठिकाणी आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल