अब्भान (संघांत परत घेणें)
८१. त्या भिक्षूनें परिवास आणि मानत्त पूर्ण केल्यावर जेथें वीस भिक्षूंचा संघ असेल तेथें जाऊन त्या संघासमोर आपण परिवास आणि मानत्त पूर्ण केल्याचें संघाला सांगावें; व संघानें नियमाप्रमाणें निज्ञप्ति करून त्रिवार जाहीर करून त्याला पुन्हां संघांत घ्यावें. ह्याला अब्भान कर्म म्हणतात.
अग्नीशाला आणि चंक्रम
८२. त्या काळीं वैशाली येथें भिक्षूंला उत्तम अन्नाची आमंत्रणपरंपरा होती. चांगलीं जेवणें जेवल्यानें भिक्षूंला शरीरबाधा होत असे. जीवक कौमारभृत्य कांहीं कारणास्तव वैशालीला गेला होता. तेथें त्यानें भिक्षूंची ही दशा पाहिली, व भिक्षूंला अग्निशाळा आणि चंक्रम करण्याची परवानगी द्यावी अशी भगवंताला विनंती केली. त्याप्रमाणें भगवंतानें चंक्रम व अग्निशाळा करण्याची अनुज्ञा दिली.
“चंक्रम जमिनीपेक्षां थोडा उंच असावा. त्याच्यांत विषमता नसावी. पाहिजे असल्यास चंक्रमावर छप्पर घालावें, जेणेंकरून उन्हांत किंवा पावसांत चंक्रमण करण्यास सुलभ पडेल.”
“अग्निशाळेचा चौथरा जमिनीपेक्षां उंच असावा. जमिनीला लांकडाची तक्तपोशी किंवा दगडांची किंवा विटांची फरसबंदी करावी. जर अग्निशाळा लहान असेल तर अग्निकुंड एका बाजूला करावें, व मोठी असेल तर मध्यभागीं करावें. धूर जाण्यास वर धुराडें बांधावें. आंत एख पाण्याची कुंडी व कालवून तयार केलेल्या मातीचें भांडे ठेवावें. माती स्वच्छ नसेल तर सुवासिक पदार्थानीं ती सुगंधित करावी. भिक्षूनें आपला पाट घेऊन अग्निशाळेंत जावें, व तोंडाला आगीचा त्रास होऊं नये म्हणून त्या मातीनें आपलें तोंड चोपडावें; व वाडग्यांत पाणी घेऊन वारंवार अंगास लावावें. अग्निशाळेंतून बाहेर आल्यावर स्नान करून अंग स्वच्छ करावें.”
बुद्धोपदेश चालू भाषेंत लिहावा
८३. यमेळु व तेकुल ह्या नांवाचे ब्राह्म जातीचे विद्वान भाऊ भिक्षु झाले होते. ते एकदा भगवंताला वंदन करून म्हणाले, “सध्यां निरनिराळे भिक्षु आपापल्या भाषेंतून बुद्धोपदेश लोकांना सांगतात. तेव्हां आम्हांला तो वैदिक भाषेंत तयार करण्यास परवानगी द्या.” त्याबद्दल भगवंतानें त्यांना दोष दिला; व तो भिक्षूंना म्हणाला, “बुद्धोपदेशाचें वैदिक भाषेंत भाषांतर करूं नये, पण आपापल्या भाषेंतून बुद्धोपदेश शिकण्यास मी परवानगी देतों.”
विहारांत येणार्यां, राहणारर्या व विहारांतून जाणार्या भिक्षूंचें कर्तव्य
८४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं आरामांत येणारे भिक्षु (आगंतुक) अव्यवस्थितपणें वागत असत. तेव्हां त्यांना भगवंतानें नियम घालून दिले ते असे:-
आगंतुक भिक्षूनें आरामांत शिरतेवेळीं वहाणा काढून त्या हातांत घ्याव्या. छत्री खालीं करावी. डोक्यावरून चीवर असल्यास खांद्यावर आणावें. आणि सावकाशपणें आरामांत प्रवेश करावा. आंत गेल्यावर भिक्षूंची एकत्र जमण्याची जागा कोठें आहे तें पहावें. तेथें जाऊन आपलें भिक्षापात्र व चीवर एका बाजूला ठेवावें, व योग्य आसन पाहून त्यावर बसावें. पिण्याचें व वापरण्याचें पाणी कोठें असतें हें त्या भिक्षूंस विचारावें. पाणी प्यावयाचें असल्यास प्यावें व वापरण्याच्या पाण्यानें पाय धुवावे. पाय धूत असतां एका हातानें पाणी घेऊन दुसरर्या हातानें पाय चोळावे. वहाणा पुसण्याचें फडकें कोठें आहे हें विचारून घेऊन त्यानें वहाणा पुसाव्या. पहिल्यानें कोरड्या फडक्यानें पुसून मग त्या ओल्या फडक्यानें पुसाव्या. तेथला रहिवासी भिक्षु आपणाहून वडील असेल तर त्याला नमस्कार करावा; कमी वयाचा असेल तर त्याचा नमस्कार घ्यावा. आपली रहाण्याची जागा कोणती व तेथें कोणी रहात होता किंवा नाहीं हें विचारावें. भिक्षेला जाण्याची जागा कोणती व न जाण्याची कोणती, संघाला मदत करणारीं घरें कोणतीं हें समजावून घ्यावें. पायखाना व लघवीची जागा कोणती, व हातांत घेण्याची काठी कोणती हें विचारावें. आरामांत येण्याजाण्याच्या व संघकृत्यें करण्याच्या वेळा कोणत्या हें विचारून घ्यावें.
विहारांत भिक्षु नसतील तर दार ठोठावून थोडा वेळ बाहेर उभें रहावें. मग कडी काढून आंत जावें. तो विहार अस्वच्छ असेल तर शक्य असल्यास साफ करावा. कलम ९ ते ११ पर्यंत सांगितलेले नियम पाळण्यांत यावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.