भाग ३ रा
महाश्रावकांचा परिचय
‘असीति महासावक’१ म्हणजे ऐशीं महाश्रावक अशा अर्थाचा उल्लेख बु्द्धघोषाचार्याच्या अद्वकथांतून अनेक ठिकाणीं आला आहे. परंतु त्यांचीं नांवें कोठेंहि दिलीं नसल्यामुळें हे महाश्रावक कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. थेरगाथेंत २६४ थेरांच्या गाथा आहेत. व अपदानांत थेरांचीं ५५० अपदानें आहेत. तेव्हां ह्यांपकीं ऐशीं महाश्रावक कोण होते, हें सांगतां येणें शक्य नाहीं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- कोठें कोठें ‘असीति महाथेरा’ असाहि उल्लेख आढळतो. परंतु त्रिपिटक वाङ्मयांत नांवाजलेल्या स्थविरांची जीं नांवे सांपडतात, त्या सर्वांचा एतदग्ग प्रकरणांत समावेश झाल्याचें दिसून येतें. हे सर्व स्थविर एकेचाळीसच आहेत. तेव्हां दुसरे एकुचाळीस कोण, हें सांगणें कठीण पडतें. भिक्षुणी, उसपाक आणि उपासिका ह्यांची महती कमी कमी होत गेल्यामुळें ‘असीति महासावक’ म्हणण्याच्या ऐवजीं ‘असीति महाथेरा’ म्हणण्याचाहि प्रघात पडला असावा.

अंगुत्तरनिकायाच्या एककनिपातांत एतदग्ग नांवाचें एक प्रकरण आहे. निरनिराळ्या भिक्षूंना, भिक्षुणींना, उपासकांना आणि उपासिकांना त्या त्या गुणांत बुद्धानें अग्रस्थान दिलें असल्यामुळें ह्या प्रकरणाला एतदग्ग असें म्हणतात. ह्यांत सात वग्ग असून एकंदर ऐशीं सुत्तें आहेत. बहुधा प्रत्येक व्यक्तीला उद्देशून एक एक सुत्त आहे. परंतु चुल्लपंथकाला उद्देशून दोन, सुभूतीला उद्देशून दोन व आनंदाला उद्देशून पांच सुत्तें आहेत; आणि तपुस्स व भल्लिक ह्यांचा एका सुत्तांत समावेश केला आहे. म्हणजे ह्या ऐशीं सुत्तांत एकंदर ७५ व्यक्तींचा उल्लेख आहे. पैकीं ४१ भिक्षु, १३ उपासक व १० उपासिका आहेत.
बुद्धाच्या श्रावकसमूहाचा एका ठिकाणीं सर्वांत प्राचीन असा उल्लेख ह्या एकदग्ग प्रकरणांत आहे. पण येथें दिलेल्या व्यक्तींना महाश्रवाक म्हणतां येईल कीं काय, हा प्रश्न आहे. एकतर ह्यांत भिक्षु आणि भिक्षुणींचाच नव्हे तर उपासक आणि उपासिकांचाहि संग्रह केलेला आहे; व दुसरें त्यांची संख्या बरोबर ऐशीं भरत नाहीं.
बुद्धाच्या श्रावकांत भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिक असे चार भेद होते. त्यांपैकीं भिक्षूंचे आणि भिक्षुणींचे भिन्न भिन्न संघ असत; आणि उपासक व उपासिका ह्यांचे संघ नसत. परंतु धर्माच्या बाबतींत चारांनाहि सारखाच अधिकार असे. जसे भिक्षुभिक्षुणीसंघांत सोतापन्न, सकदागामी आणि अनागामी असत, तसेच ते उपासक-उपासिकांतहि असत. उपासक अर्हन् झाला तर तो बहुधा गृहस्थाश्रमांत न राहतां भिक्षु होत असे. महापरिनिब्बानसुत्तांत एके ठिकाणीं मार१ (१- दीघनिकाय भाग. २. पृष्ठ १०४-१०५) बुद्धाला म्हणतो, “भगवान्, आतां आपण परिनिर्वाणाला जा. हा आपला परिनिर्वाणकाल आहे. तुम्ही म्हणालांत कीं, ‘हे मार, जोपर्यंत माझे भिक्षु...भिक्षुणी...उपासक....उपासिका व्यक्त, विनीत, विशारद, बहुश्रुत, धर्मधर, धर्मानुधर्मप्रतिपन्न, सामीचीप्रतिपन्न, धर्माप्रमाणें वागणारे, माझा धर्म शिकून उत्तम रितीनें उपदेश करण्यास समर्थ व वादांत हार न जाणारे असे श्रावक व श्राविका होणार नाहींत तोंपर्यंत मी परिनिर्वाणाला जाणार नाहीं. परंतु आतां तुमच्या भिक्षु, भिक्षुणी वगैरे श्रावक, श्राविका तुमच्या म्हणण्याप्रमाणें तयार झाल्या आहेत. तेव्हां आतां आपण परिनिर्वाणाला जा. आपला हा परिनिर्वाण काल आहे.२”

२- भिक्षुभिक्षुणी व उपासक-उपासिका ह्यांचा निरनिराळ्या कलमांत उल्लेख आहे. पण सर्वांना लावलेलीं विशेषणें एकच असल्यामुळें येथें तो सर्व मजकूर थोडक्यांत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.