महाभारत

१२५. अल्बेरूनीच्या इण्डियामध्यें पुराणाच्या खालीं दिलेल्या दोन याद्या सांपडतात.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Alberubin’s India, i. 130-131.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. आदि            १. ब्रह्म
२. मत्स्य         २. पद्म
३. कूर्म            ३. विष्णु
४. वराह           ४. शिव
५. नरसिंह        ५. भागवत
६. वामन          ६. नारद
७. वायु            ७. मार्कण्डेय
८. नंद             ८. अग्नि
९. स्कन्द          ९. भविष्य
१०. आदित्य      १०. ब्रह्मवैवर्त
११. सोम           ११. लिंग
१२. सांब           १२. वराह
१३. ब्रह्माण्ड        १३. स्कन्द
१४. मार्कण्डेय     १४. वामन
१५. तार्क्ष्य         १५ कूर्म
१६. विष्णु          १६. मत्स्य
१७. ब्रह्म            १७. गरुड
१८. भविष्य         १८. ब्रह्माण्ड

१२६.  या दोन याद्यांपैकीं दुसरी यादी विष्णुपुराणाच्या आधारें दिली आहे. पहिल्या यादींतील काहीं पुराणें दुसर्‍या यादींत, व दुसर्‍या यादींतील कांहीं पहिल्या यादींत नाहींत. तरी पण गुप्तांच्या वेळीं या पुराणांची रचना झाली असावी. वर दिलेल्या निद्देसाच्या उतार्‍यांतील आदित्य, सोम, ब्रह्म, अग्नि, व गरुड ह्या देवता या याद्यांतहि सांपडतात. अशा देवतांच्या कांहीं दंतकथा त्यांच्या भक्तांमध्ये चालू होत्याच. त्या एकत्र करून आणि त्यांत नवीन भर घालून हीं पुराणें रचलीं असावींत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन या देवतांचा उल्लेख निद्देसांत नाहीं. तरी बाबिलोनियन दंतकथांतून ह्या देवता आल्या असाव्यात, व त्यांच्याच दंतकथांवरून ह्या पुराणांची उत्पत्ति झाली असावी. ह्या सर्व पुराणांचा नीट अभ्यास करून त्यांतील सार शोधून काढणें फार कठिण काम आहे. त्याला जो काळ पाहिजे आहे तो मजपाशीं नाहीं. तेव्हां तें काम पुढल्या पिढीवर सोंपवून आतां महाभारताकडे वळतों.

१२७. ही यादी दिल्यानंतर अल्बेरूनीनें महाभारताचा उल्लेख केला आहे; व त्याच्या अठरा पंर्वांची यादी दिली आहे. त्यांत एकोणिसाव्या हरिवंश पर्वाचाहि समावेश होतो असें त्याचें म्हणणें. तेव्हां अल्बेरूनीच्या वेळीं महाभारत बहुतेक आज असलेल्या स्वरूपांत अस्तित्वांत होतें असें दिसतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel