७. येथें आळवक यक्षाला बौद्धधर्मी बनवण्याचा प्रयत्‍न उघड दिसतो. त्याचप्रमाणें सातागिरि व हेमवत ह्या यक्षांचीहि गोष्ट ह्याच सुत्तनिपातांत आली आहे. संयुक्त निकायांतील यक्खसंयुत्तांत अनेक यक्षांच्या गोष्टी आहेत. देवता व देवपुत्तसंयुत्तांत अनेक देवतांच्या व देवपुत्रांच्या कथा आहेत. त्याच प्रमाणे वन संयुत्तांत वनदेवतांच्या कथा आहेत. त्या बहुतेक फार रोचक, पण पुराणमय आहेत.

८. चारी दिशांना चार महाराजे वास करीत असत व त्यांच्या हाताखालीं पृथ्वीनिवासी यक्षादिक सर्व देवगण रहात, अशी कल्पना प्रचलित होती. या चार महाराजांचें वर्णन  दीघनिकायांतील आटानाटिय सुत्तांत व महासमय सुत्तांत आलें आहे. पैकीं आटानाटिंय सुत्ताचा सारभूत अंश येथें देतों.

९. “एके समयीं भगवान् राजगृह येथें गृध्रकूट पर्वतावर रहात होता. तेव्हां चार महाराजे आपआपलें मोठें सैन्य घेऊन त्याच्या दर्शनाला आले व भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसले. तेव्हां वैश्रवण (वेस्सवण) महाराजा भगवंताला म्हणाला, ‘उदार, माध्यम आणि हीन यक्षांत कांहीं यक्ष भगवंताचे भक्त आहेत; पण कांहीं अभक्तहि आहेत. कारण, प्राणातिपात, अदत्तादान, काममिथ्याचार, मृषावाद, व सुरामेरयादिक मादक पदार्थ, यांपासून विरत होण्यासाठीं भगवान् धर्मोपदेश करतो. पण जे यक्ष या गोष्टींपासून विरत झाले नाहींत त्यांना बुद्धाचा उपदेश अप्रिय वाटतो. भगवंताचे शिष्य अरण्यामध्यें एकान्तवासांत रहातात. तेव्हां तेथें रहाणारे जे यक्ष भगवंताचे भक्त नसतील, त्यांचीं मनें वळण्यासाठीं ही आटानाटिय १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ आटानाट नांवाचें यक्षनगर, यक्षांनी तेथें जमून तयार केलेली ही रक्षा, असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणे दिसते. )  रक्षा भगवंतानें स्वीकारावी. ती भिक्षु, भिक्षुणी, उपासक, व उपासिका, यांच्या रक्षणाला व सुखनिवासाला उपयोगीं पडेल.’
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०. “भगवंतानें वैश्रवणाची विनंती कांही न बोलतां स्वीकारली. तेव्हां वैश्रवणानें आटानाटिय रक्षा सांगितली :- विपस्सीला नमस्कार असो. सिखीला नमस्कार असो. वेस्सभूला नमस्कार असो. ककुसंधाला नमस्कार असो. कोनागमनाला नमस्कार असो. आणि सक्युपुत्ताला नमस्कार असो. पूर्व दिशेचा पालक महाराजा धृतराष्ट्र; तो गंधर्वाचा अधिपति. त्याला पु्ष्कळ पुत्र आहेत. ते देखील बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. दक्षिण दिशेचा पालक महाराजा विरुढ; तो कुंभण्डांचा अधिपति. त्याला पुष्कळ पुत्र आहेत; ते पण बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. पश्चिम दिशेचा पालक महाराजा विरूपाक्ष; तो नागांचा अधिपति. त्यालाहि पुष्कळ पुत्र आहेत; आणि तेहि बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. उत्तर दिशेचा पालक महाराजा कुबेर (कुवेर); तो यक्षांचा अधिपति. त्यालाहि पुष्कळ पुत्र आहेत; व ते देखील बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. हे मारिष, ही ती आटानाटिय रक्षा होय. ती चांगल्या रीतीनें संपादन केली असतां यक्ष, गंधर्व, कुंभण्ड किंवा नाग यांच्यापैकीं कोणीहि बाधा करणार नाहीं.

११. “पण, हे मारिष कांही अमनुष्य (यक्षादिक) फार चंड बंडखोर आहेत. ते महाराजांची आज्ञा पाळीत नाहींत. त्यांपैकीं कोणीतरी दुष्ट चित्तानें भिक्षु, भिक्षुणी, उपासक. उपासिका, ह्यांपैकीं एकाद्याचा पाठलाग केला, तर यक्षांच्या महासेनापतींना आवहान करावें कीं, हा यक्ष पाठलाग करतो; आंत शिरूं पहातो; उपद्रव देतो; त्रास देतो; हा सोडीत नाहीं. ते यक्षांचे महासेनापति कोणते?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel