दिंगबर - (श्रद्धेला ) श्रावकांच्या कुलाला एक मूहूर्तभरहि सोडूं नकोस.

श्रद्धा - जशी महाराजांची आज्ञा. (असें म्हणून निघून जाते.)

करुणा – प्रिय सखि, जरा शान्त हो. नाममात्रानें भिण्याचें कारण नाहीं. मी हिंसेकडून ऐकलें आहे कीं, तमाची कन्या श्रद्धा पाषंडांपाशींहि रहाते. तेव्हां ही तामसी श्रद्धा असली पाहिजे....

२३७. ( त्यानंतर भिक्षुरूप धारण करणारा, हातांत पुस्तक घेऊन बुद्धागम प्रवेश करतो.)

भिक्षु – (विचार करून) भो भो उपासका! सर्व पदार्थ क्षणस्थायीच व अनात्मक आहेत. ते बाह्य आहेतसे वाटतात. परंतु जेव्हां चित्तसंततीमधून सर्व वासना निघून जातात, तेव्हां ती विषयांपासून विरक्त होते. ( जरा इकडे तिकडे फिरून मोठ्या डौलानें) अहो, हा सौगत धर्म खरोखरच चांगला आहे. ज्यांत सौख्य आहे व मोक्षहि आहे. निजण्याला उत्तम आवास, आवडीप्रमाणें वाण्याच्या बायका, नियमित वेळीं मिष्ट भोजन, बिछाना उत्तम, श्रद्धेनें स्त्रिया पूजा करतात, व अशा रीतीनें मोठ्या चैनींत चांदण्याच्या रात्री निघून जातात.

करुणा – सखि ! तरुण ताडवृक्षाप्रमाणें लांब, काषाय धारण केलेला, मुंडितशिर असा हा कोण इकडे येत आहे बरें?

शांति – सखि, हा बुद्धागम आहे.

भिक्षु – ( आकाशाकडे पाहून ) भो भो उपासका, आणि भिक्षुहो, भगवान् सुगताचें वाक्यामृत ऐका! (पुस्तक वाचतो) मी दिव्य चक्षूनें लोकांची सुगति आणि दुर्गति पहातों. सर्व संस्कार क्षणिक आहेत. आत्मा स्थायी नाहीं. म्हणून भिक्षूंनी बायकांशीं अतिप्रसंग केला तरी ईर्ष्या करूं नये. कारण ईर्ष्या म्हटली म्हणजे चित्ताचें मालिन्य आहे. ( पडद्याकडे पाहून) श्रद्धे जरा इकडे ये. (श्रद्धा प्रवेश करते.)

श्रद्धा - महाराजांची काय आज्ञा आहे ?

भिक्षु - उपासकांना आणि भिक्षूंना चिरकाल आलिंगून रहा.

श्रद्धा – जशी महाराजांची आज्ञा. (असें म्हणून निघून जाते.)

शांति - सखि, ही देखील तामसी श्रद्धा काय?

करुणा – होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel