बाबिलोनियन संस्कृति
७. ख्रिस्तापूर्वीं चार पांच हजार वर्षें आजकालच्या मेसोपोटेमियाच्या आग्नेय दिशेला वसाहत करणार्या लोकांना सुमेरियन ही संज्ञा लावण्यां येते. हे सुमेरियन लोक कोठून आले याविषयीं बराच वाद आहे. ते मध्य एशियांतून आले असावे असें अधिकतर तज्ज्ञांचें मत आहे. कारण आर्य लोकांशीं त्यांचें बरेंच साम्य होतें असें सिध्द झालें आहे. ह्या लोकांनी प्रथमत: आपल्या वसाहती युफ्रेतिस आणि तैग्रिस या नद्यांच्या२ मुखाजवळ केल्या; व त्या हळू हळू उत्तरेकडे पसरत गेल्या. हे लोक लहान लहान शहरांतून रहात असत; आणि त्या शहरा-शहरांमध्यें वारंवार लढाया होत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( २ आजकाल या दोन नद्या समुद्राला मिळण्यापूर्वीच एकत्र होतात. पण प्राचीन काळीं त्या निरनिराळ्या ठिकाणीं समुद्राला मिळत. आज समुद्रहि १२५ मैल हटला आहे.
When Sumeria Was beginning to flourish, these two rivers had separate outlets, and Eridu, the seat of cult of the sea god Ea, which now lies 125 miles inland, was seaport at the head of the Persian Gulf. A day’s journey separated the river mouths when Alexander the Great broke the power of the Persian Empire.
Myths of Babylonia and Assyria. p .22-23 )

८. अशा स्थितींत सेमेटिक जातीचे लोक येऊन त्यांनी उत्तरेकडील टापू काबीज केला. हे लोक आले कोठून याविषयींहि बराच वाद आहे. तरी त्यांचा प्राचीन आरब लोकांशीं निकट संबंध दिसतो. हे लोक कांही अंशीं जंगली होते. उत्तरेकडील सुमेरियन लोकांना त्यांनी जिंकलें खरें, परंतु सुमेरियन संस्कृति त्यांना जशाच्या तशीच घ्यावी लागली. भाषा मात्र त्यांनी आपली ठेवली. सुमेरियन भाषा देखील चालू होतीच. पुढें जेव्हां या लोकांनी दक्षिणेकडील सुमेरियन राजांना जिंकलें, तेव्हां बहुतेक ठिकाणीं याच लोकांच्या भाषेचा प्रसार झाला, व सुमेरियन भाषा आजकालच्या आमच्या संस्कृत भाषेसारखी मृत भाषा झाली. ती समजण्यासाठीं कोष व व्याकरणें रचावीं लागलीं.
९. या सेमेटिक लोकांनी प्रथमत: जो उत्तरेकडील टापू जिंकला, त्याला अक्काड (Akkad )किंवा अगादे (Agade ) म्हणत, व दक्षिणेकडील सुमेरियनांच्या टापूला सुमेर (Summer ) किंवा शुमेर (Shumer ) म्हणत. ह्या दोन्ही प्रांतांना मिळून बाबिलोनिया म्हणण्याचा प्रघात आहे; आणि त्याच अर्थी हा शब्द ह्या विभागांत वापरला आहे.
१०. इ० स० पूर्वीं अठराव्या शतकाच्या आरंभीं केशी (Kassi ) लोकांच्या बाबिलोनियावर स्वार्या होऊं लागल्या, व १७६० च्या सुमारास गंदश (Gandash ) नांवाच्या केशी राजानें आपलें सार्वभौम राज्य स्थापन केलें. त्या पूर्वीं एक दोन शतकें केशी लोक उदरनिर्वाहासाठीं बाबिलोनियांत येत असत. ते पिकाच्या वेळीं शेताच्या कापणीला व धान्य गोळा करण्याला मदत करीत, व पुन्हा आपल्या पहाडी मुलुखांत जात. पर्शिया आणि बाबिलोनिया यांच्या दरम्यान एलाम ( Elam ) नांवाच्या प्रदेशांत त्यांचें वसतिस्थान होतें. हे लोक बाबिलोनियनांपेक्षां मागसलेले असले तरी एका बाबतींत ते फार पुढें गेले होते. त्यांच्या आगमनापर्यंत बाबिलोनियन लोकांना घोडा कसा तो मुळींच माहीत नव्हता; आणि केशी लोक तर घोड्यावर बसण्यांत इतके पटाईत होते कीं, घोडदळाच्याच साहाय्यानें त्यांनी बाबिलोनियन देश जिंकला.
११. प्रथमत: केशी लोक बाबिलोनियन लोकांत मिसळत नसत. त्यांनी सारा-वसुलींत कांहीं सुधारणा केल्या; पण इतर बाबतींत बाबिलोनियन लोकांची सर्व संस्कृति हळू हळू आत्मसात् केली. अक्केडियन किंवा सेमेटिक लोकांनी सुमेरियनांना जिंकलें. परंतु सुमेरियन संस्कृतीनें सेमेटिकांना जिंकलें. त्याचप्रमाणें केशी लोकांनी जरी बाबिलोनियन लोकांना जिंकलें तरी बाबिलोनियन संस्कृतीनें त्यांना जिंकलें. म्हणजे देवदेवतांच्या व इतर सामाजिक बाबतींत सुमेरियन परंपरा तशीच कायम राहिली. केशी लोकांनी आपल्या भाषेचाहि प्रसार करण्याचा प्रयत्न केला नाहीं. त्यांचा सर्व व्यवहार अक्केडियन भाषेंतच चालत होता. आरंभीं आरंभीं त्यांचीं नांवें मात्र बाबिलोनियन नांवांहून भिन्न असत. आमच्या इकडील शक, मालव, हूण, गुर्जर, पर्शियन इत्यादिक भिन्न भिन्न जातींच्या लोकांनी हिंदुस्तानांत प्रवेश केल्यावर आपली मूळ संस्कृति सोडून हिंदु संस्कृति स्वीकारली, त्याचप्रमाणें ह्या केशी लोकांनी बाबिलोनियांत गेल्यावर हळू हळू सर्व बाबिलोनियन संस्कृति पूर्णपणें अंगिकारली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.