आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वितत्य ह्यञ्जसा नु कौ ।

तमोऽनया तरिष्यन्तीत्यगात्स्वं पदमीश्वरः ॥७॥

यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती ।

जेणें जड जीव उद्धरती । श्रवणें त्रिजगती पावन होये ॥६४॥

स्वधामा गेलिया चक्रधरु । मागां तरावया संसारु ।

कृष्णकीर्ति सुगम तारुं । ठेवून श्रीधरु स्वयें गेला ॥६५॥

नवल त्या तारुवाची स्थिती । बुडवूं नेणे कल्पांतीं ।

श्रवणें तरले नेणों किती । पुढेंही तरती श्रद्धाळू ॥६६॥

श्रीकृष्णकीर्तीचें तारुं । घालितां आटे भवसागरु ।

तेथें कोरडया पाउलीं उतारु । श्रवणार्थी नरु स्वयें लाहे ॥६७॥

जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्यांच्या संसारासि पडे शून्य ।

कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥६८॥

आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति । पायां लागती चारी मुक्ति ।

त्यांचेनि पावन त्रिजगती । परमनिर्वृत्ति हरिनामें ॥६९॥

श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें । रिघतांचि श्रवणद्वारें ।

भीतरील तम एकसरें । निघे बाहेरें गजबजोनि ॥२७०॥

तंव कृष्णकीर्तिकथागजरीं । तमासि ठावो नुरेचि बाहेरी ।

धाकेंचि निमे सपरिवारीं । कृष्णकीर्तिमाझारीं परमानंदु ॥७१॥

कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें । संसार कृष्णमय दिसे ।

कीर्ति कीर्तिमंताऐसें । दे अनायासें निजसुख ॥७२॥

जो देखिलिया देखणें सरे । जो चाखिलिया चाखणें पुरे ।

जो ऐकिलिया ऐकणें वोसरे । जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति ॥७३॥

ज्यासि झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी ।

ज्यासि बोलतां गोठी । पडे मिठी परमार्थीं ॥७४॥

ज्यासि दिधलिया खेंव । खेंवाची पुरे हांव ।

ज्याचें घेतांचि नांव । नासे सर्व महाभय ॥७५॥

तो सत्यसंकल्प ईश्वरु । स्वलीला सर्वेश्वरु ।

स्वपदासि शार्ङगधरु । अतिसत्वरु निघाला ॥७६॥;

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी