गुणैर्गुणान् स भुञ्जान आत्मप्रद्योतितैः प्रभुः ।

मन्यमान इदं सृष्टमात्मानमिह सज्जते ॥५॥

इंद्रियां आणि विषयांसी । सहजें अंतर्यामी प्रकाशी ।

जीव सेवूनि त्या विषयांसी । पावे आसक्तीसी अहंभावें ॥१३०॥

म्हणे हे विषय कैसे गोड । माझ्या देहाचें पुरे कोड ।

तंव इंद्रियांची खवळे चाड । विषय वाड भोगावया ॥३१॥

इंद्रियां विषयांची आसक्ती । देहाभिमानें वाढे वृत्ती ।

मावळोनि मूळींची स्फूर्ती । मोहममतास्थिती दृढ वाढे ॥३२॥

मग मी म्हणे देहातें । देहसंबंधीं जें तें आप्तें ।

विषयांचिये लोलुपते । उसंतु चित्तें असेना ॥३३॥

प्रकृतिस्वभावें कर्म जाहलें । तें तें म्हणे म्यां केलें ।

देहअहंतेचें नाथिलें । काविरें चढलें अनिवार ॥३४॥

देहअहंता अतिउद्धट । तेथें मोहममता अतिदुर्घट ।

तेणें जन्ममरणांची वाट । घडघडाट प्रवाहे ॥३५॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel