एकादशत्वमात्माऽसौ महाभूतेन्द्रियाणि च ।

अष्टौ प्रकृतयश्चैव पुरुषश्च नवेत्यथ ॥२४॥

अकरा तत्त्वें बोलिलीं येथें । पांच इंद्रियें पंच महाभूतें ।

जीव शिव आणि मनातें । एकत्वें येथें गणिलीं देख ॥१४॥

दृति मृदु आणि पिंवळा । एकत्वें जेवीं चांपेकळा ।

सुवास सुस्वाद सुनीळा । एकत्र मेळा आम्रफळीं ॥१५॥

तेवीं जीव शिव आणि मन । तिन्ही एकरुपचि जाण ।

जेवीं हे ममणी संपूर्ण । हेमसूत्रीं सज्ञान ओंविती ॥१६॥

पंच इंद्रियें पंच महाभूतें । जीव शिव मन एकात्मते ।

एकादश तत्त्वें येथें । जाण निश्चितें या हेतू ॥१७॥;

प्रकृति पुरुष महदहंकार । पंच महाभूतें अविकार ।

सकळ विकारसंभार । यामाजीं साचार अंतर्भूत ॥१८॥

एवं ऋषीश्वरांच्या व्युत्पत्ती । तत्त्वविवक्षा उपपत्ती ।

नव तत्त्वसंख्यायुक्ती । जाण या रीतीं उद्धवा ॥१९॥

एक बोलती निजज्ञानी । प्रकृति पुरुष तत्त्वें दोनी ।

आन पाहतां जनींवनीं । तिसरें नयनीं दिसेना ॥२२०॥

जे निश्चयें अतिनिष्टंक । ते म्हणती तत्त्व एक ।

एक तेंचि अनेक । अनेकीं एक निश्चित ॥२१॥

जेवीं सुवर्णाचें भूषण । भूषणीं स्वयें सुवर्ण ।

तेवीं अनेकीं एकपण । एकत्वें जाण निश्चित ॥२२॥

जेवीं उंसाची निजगोडी । गूळसाकरेच्या मोडी ।

तेचि दिसे चढोवढी । तेवीं तत्त्वपरवडी निजतत्त्वें ॥२३॥

त्या जाणावया निजतत्त्वातें । ऋषीश्वरांचीं बहुत मतें ।

मी स्वल्पचि बोलिलों येथें । येरवीं अगणितें ग्रंथांतरीं ॥२४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel