अर्चादौ हृदये चापि यथालब्धोपचारकैः ।

द्रव्यक्षित्यात्मलिङगानि निष्पाद्य प्रोक्ष्य चासनम् ॥५०॥

प्रयोगछंद संपूर्ण । पूर्वान्वयो विपरीत जाण ।

द्रव्यशुद्धि क्षितिमार्जन । हें मागील निरुपण पुढां आलें ॥८२०॥

द्रव्यशुद्धि मुख्यशोधन । भूमिशुद्धि संमार्जन ।

आत्मशुद्धि सावधान । काढिल्या अनुलेपन मूर्तिशुद्धी ॥८२१॥

पूजासंभार सिद्ध करून । समस्त शंखतोयें प्रोक्षून ।

निजासनीं सावधान । एकाग्र जाण बैसावें ॥८२२॥

ज्यासी ध्यानीं मूर्ति न ये संपूर्ण । तेणें प्रतिमामूर्ति अधिष्ठान ।

तेथेंचि करावें पूजन । लब्धोपचारें जाण आगमोक्त ॥८२३॥

ज्यासी ध्याना मूर्ति ये अतिसंकटीं । तेणें बाह्योपचार‍आटाटी ।

सांडूनियां ध्यानदृष्टीं । करावी गोमटी मानसपूजा ॥८२४॥

ज्याचे हृदयींचें न विकरे ध्यान । बाह्यमूर्तिपूजेसी सावधान ।

तेणें उभयतां पूजन । करावें संपूर्ण आगमोक्त ॥८२५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel