षडित्यत्रापि भूतानि, पञ्च षष्ठः परः पुमान् ।

तैर्युक्ताआत्मसम्भूतैः, सष्टेववं समुपाविशत् ॥२०॥

चत्वार्येवेति तत्रापि, तेज आपोऽन्नमात्मनः ।

जातानि तैरिदं जातं, जन्मावयविनः खलु ॥२१॥

पाहें पां पंच महाभूतें । पुरुषें सृजिलिया येथें ।

स्वयें प्रवेशला तेथें । यालागीं त्यातें ’षट्‌’ म्हणती ॥९८॥

ज्यांचेनि मतें तत्त्वें चारी । तयांची ऐक नवलपरी ।

जो देखे प्रत्यक्षाकारीं । तोचि धरी तत्त्वार्थ ॥९९॥

प्रत्यक्ष देखिजेती नयनीं । अग्नि आप आणि अवनी ।

तींचि सत्यत्वें मानी । मतज्ञानी मतवादी ॥२००॥

या स्थूळातें चेतविता । तो आत्मा घेतला चौथा ।

या तिहींवीण साकारता । न घडे सर्वथा सृष्टीसी ॥१॥

नाम रुप क्रिया कारण । सृष्टीसी मुख्यत्वें यांचेनि जाण ।

यालागीं भूतें तीनचि प्रमाण । बोलतें लक्षण तें ऐसें ॥२॥

एवं भूतें तीन, आत्मा चौथा । हे चौं तत्त्वांची व्यवस्था ।;

आतां सतरा तत्त्वांची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel