नानुतृप्ये जुषन्युष्मद्वचो हरिकथामृतम् ।
संसारतापनिस्तप्तो मर्त्यस्तत्तापभेषजम् ॥२॥
सेवितां तुमचें वचनामृत । पुरे न म्हणे माझें ’चित्त’ ।
आस्वादितां शब्दीं शब्दार्थ । ’श्रवण’ क्षुधार्त अधिक जाहले ॥२६॥
अद्भुत कथा अतिसुरस । श्रवणीं श्रवणा अधिक सोस ।
’रसना’ म्हणे हा अतिगोड रस । ’डोळ्यां’ उल्हास हें अपूर्व रुप ॥२७॥
’घ्राण’ म्हणे हा निजगंधु । सुमनीं सुमना अतिसुगंधु ।
’वाचा’ म्हणे हा शब्दु । परमानंदु अनुवादे ॥२८॥
नवल निरुपणाचा यावा । ’भुजां’ स्फुरण ये द्यावया खेवा ।
आलिंगन जीवींच्या जीवा । निजसद्भावा होतसे ॥२९॥
तुमच्या कथा सुनिश्चितीं । दिव्यौषधि भवरोग छेदिती ।
त्रिविध तापांची निवृत्ती । जड मूढ प्राकृतीं ऐकता भावें ॥३०॥
राजा परमार्थें साकांक्ष । देखोनि सार्थक कथेचें लक्ष ।
हरीधाकुटा ’अंतरिक्ष’ । निरुपणीं दक्ष बोलता झाला ॥३१॥;
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.