अभीक्ष्णशस्ते गदितं, ज्ञानं विस्पष्टयुक्तिमत् ।

एतद्विज्ञाय मुच्येत, पुरुषो नष्टसंशयः ॥२४॥

जेथ वेदशास्त्रांसी कुवाडें । जें बोलीं बोलतां नातुडे ।

तेंचि ज्ञान म्यां तुजपुढें । निजनिवाडें सांगितलें ॥१७॥

जें सांगितलें शुद्ध ज्ञान । तें नाना युक्तींकरुनि जाण ।

दृढतेलागीं निरुपण । पुनः पुनः जाण म्यां केलें ॥१८॥

बहुत न लावितां खटपट । तुज न वाटतांही कष्ट ।

ज्ञान सांगितलें विस्पष्ट । जेणें होती सपाट संशय सर्व ॥१९॥

हें जाणितलिया ज्ञान । सर्व संशय होती दहन ।

साधक होय ब्रह्मसंपन्न । स्वानंदपूर्ण सर्वदा ॥४२०॥

म्यां सांगितलें गुह्यज्ञान । एकादशाचें निरुपण ।

याचें श्रवण पठण मनन । करी तो धन्य उद्धवा ॥२१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel