मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तमिदं जगत् ।

गुणप्रवाह एतस्मिन्नुन्मज्जति निमज्जति ॥१५॥

मुख्य मूळीं मी जगाचा धरिता । स्त्रष्टृरुपें मीचि स्त्रजिता ।

विष्णुरुपें मी प्रतिपाळिता । मीचि संहर्ता रुद्ररुपें ॥४६॥

हे त्रिगुण काळाची काळसत्ता । तो मी निजकाळ तत्त्वतां ।

स्त्रजिता पाळिता संहर्ता । गुणावस्थाविभागें ॥४७॥

जनांचें वासनाकर्म विचित्र । तेचि काळसत्ता निजसूत्र ।

तेणें रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥४८॥

गुणकर्में स्वर्गा चढे । गुणकर्में नरकीं पडे ।

नाना योनींचें सांकडें । भोगणें घडे गुणकर्में ॥४९॥

स्वर्ग भोगूनि वाडेंकोडें । महर्जनतपोलोकांपुढें ।

सत्यलोकावरी वरता चढे । उन्मज्जन घडे या नांव ॥४५०॥

पशुपक्षिस्थावरांत । वृक्षपाषाणकृमित्व प्राप्त ।

महानरकीं अधःपात । निमज्जन एथ त्या नांव ॥५१॥

उंचीं चढोनि नीचीं पडणें । भोगवी नाना जन्ममरणें ।

तें प्रकृतिपुरुषांचें साजणें । जीवबंधनें भोगवी ॥५२॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel