यथा हिरण्यं सुकृतं पुरस्तात्पश्चाच्च हिरण्मयस्य ।

तदेव मध्ये व्यवहार्यमाणं नानापदेशैरहमस्य तद्वत् ॥१९॥

मुकुट कुंडलें करकंकणें । न घडितां सोनें सोनेपणें ।

त्याचीं करितां नाना भूषणें । लेणेंपणें उणें नव्हेचि हेम ॥६३॥

ते न मोडतां अळंकारठसे । सोनें अविकार संचलें असे ।

तेवीं उत्पत्तिस्थितिविनाशें । माझें स्वरुप चिदंशें अविनाशी ॥६४॥

माझें स्वरुप शुद्ध परब्रह्म । तेथ नाना रुप नाना नाम ।

भासतांही जग विषम । ब्रह्मसम समसाम्यें ॥६५॥

जेवीं सूर्याचे किरण । सूर्यावेगळे नव्हती जाण ।

तेवीं जग मजशीं अभिन्न । तेंचि निरुपण हरि सांगे ॥६६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel