अभ्यङगोन्मर्दनादर्शदन्तधावाभिषेचनम् ।
अन्नाद्यं गीतनृत्यानि, पर्वणि स्युरुतान्वहम् ॥३५॥
पर्वें बोलिलीं आगमोक्तीं। अथवा वार्षिक पर्वें येती ।
कां निजमूर्तीची जयंती । ते पूजा श्रीपति स्वयें सांगे ॥९९॥
दंतधावन उद्वर्त्तन । मूर्तीसी द्यावें अभ्यंजन ।
पंचामृतें करुनि स्नपन । विचित्राभरण पूजावी ॥३००॥
पूजोनि साळंकृत देवासी । नैवेद्य अर्पावे षड्रसीं ।
देऊनि करोद्वर्तनासी । मुखवासासी अर्पावें ॥१॥
देव विसरला देवपणासी । तें देवपन भेटे देवासी ।
ऐशिया दाखवावें आदर्शासी । तेणें देवदेवासी उल्हासु ॥२॥
पर्वविशेषीं जयंतीसी । मेळवूनि संतवैष्णवांसी ।
करावें गीतनृत्यकीर्तनासी । अतिप्रेमेंसीं अहोरात्र ॥३॥;
आगमोक्त दीक्षा हवन । करितां तत्काळ देव प्रसन्न ।
त्या होमाचें विधिविधान । ऐक सावधान उद्धवा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.