पौर्वापर्यमतोऽमीषां, प्रसङस्त्रयानमभीप्सताम् ।

यथा विविक्तं यद्वक्रं, गृह्णिमो युक्तिसम्भवात् ॥९॥

म्यां सांगितली तैशी जाण । तत्त्वसंख्या अधिकन्यून ।

व्हावया हेंचि कारण । वक्‍त्याची ज्ञानविवक्षा ॥८८॥

जैसें ज्यासी असे ज्ञान । जैसा ईप्सित मताभिमान ।

तैसतैसें तत्त्वव्याख्यान । ऋषीश्‍वर जाण बोलती ॥८९॥

जो बोले ज्या मतयुक्ती । तें तें घडे त्या मतसंमतीं ।

हें मी जाणें सर्वज्ञ श्रीपती । यालागीं त्या युक्ती मीही मानीं ॥९०॥;

जें बोलिले ऋषिजन । सव्वीस तत्त्वें विवंचून ।

उद्धवा तुज मी सांगेन । सावधान अवधारीं ॥९१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel