एवं जिज्ञासयापोह्य नानात्वभ्रममात्मनि ।

उपारमेत विरजं मनो मय्यर्प्य सर्वगे ॥२१॥

नित्यमुक्त अव्ययो । स्वरूप जाणावया पहा हो ।

ज्याचा लागला दृढ भावो । आन आठवो नाठवे ॥३९॥

ऐसी मज जाणावयाची अवस्था । त्या नांव बोलिजे जिज्ञासता ।

माझे प्राप्तीलागीं सर्वथा । पांडित्यमान्यता तो नेघे ॥६४०॥

देहादि अध्यासू आपुल्या ठायीं । श्रवणें मननें मिथ्या केला पाहीं ।

दृढ विश्वास गुरूच्या पायीं । पूर्णब्रह्माच्या ठायीं निर्धारू ॥४१॥

तेथ पुढारीं चालावया वाट । भगवद्‍भजनीं अतिउद्‍भट ।

कां सांडोनि कर्मकचाट । ध्याननिष्ठ तो होय ॥४२॥

तेथ ध्येय ध्याता ध्यान । न दिसे त्रिपुटीचें भान ।

कोंदलें चैतन्यघन । वस्तु सनातन तो पावे ॥४३॥

तेथ कैंचा कर्ता क्रिया कर्म । फिटला नानात्वाचा भ्रम ।

सबाह्य कोंदलें परब्रह्म । जाला उपरम गुरुकृपा ॥४४॥

सर्वगत सर्वकाळ । सर्वदेशीं सर्वीं सकळ ।

वस्तु असे जें केवळ । तेथ निश्चळ निजबोधू ॥४५॥

ऐसिये वस्तूची धारणा । ज्याचेनि न करवे जाणा ।

तरी सुगम उपाया आना । एक विचक्षणा सांगेन ॥४६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel