सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया ।

न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥३९॥

पृथ्वीचिया परमाणुकणा । मी काळरूपें करी गणना ।

परी विभूतिसंख्याप्रमाणा । माझेनिही जाण न गणवती ॥८३॥

म्यां सृजिलें अनंत ब्रह्मगोळ । ते मज गणवतीना सकळ ।

मा विभूति माझ्या केवळ । कोण तोंडाळ गणूं शके ॥८४॥

मी सर्वज्ञ श्रीनारायण । माझ्या विभूति मज जाण ।

गणावया नाहीं आंगवण । मा निरूपण केवीं सांगें ॥८५॥

मनुष्यांमाजी माझी विभूती । नांदतसे कोणे स्थितीं ।

ते खूण सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥८६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel