ज्ञानविज्ञानयज्ञेन मामिष्ट्वाऽऽत्मानमात्मनि ।

सर्वयज्ञपतिं मां वै संसिद्धिं मुनयोऽगमन् ॥६॥

जे ज्ञानधनें अतिसंपन्न । परम पवित्र विज्ञानें जाण ।

ऐसे ब्रह्मभूत जे ब्राह्मण । यज्ञद्वारा यजन करिती माझें ॥७२॥

हृदयाच्या निजभुवनीं । विकल्पाची भूमि खाणोनी ।

शम-दम-विरक्ती कुंडें तिन्ही । केलीं आवो साधुनी श्रद्धेचा ॥७३॥

तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्रें दृढ मंथूनी ।

काढिला सूक्ष्म निर्धूमाग्नी । कुंडीं स्थापूनी पेटविला ॥७४॥

शुद्धसत्त्वाचें घृत तेथ । रजतमद्रव्येंसीं मिश्रित ।

वैराग्यस्त्रुवेनें आहुती देत । मंत्र तेथ युक्तीचे ॥७५॥

घेऊनि विद्याशस्त्र लखलखित । संकल्पपशूचा करूनि घात ।

तेणें यज्ञपति श्रीअनंत । केला तृप्त निजबोधें ॥७६॥

तेथ पूर्णाहुतीस कारण । घालितां जीवभावाचें अवदान ।

यज्ञभोक्ता मी श्रीनारायण । परमात्मा जाण सुखी झालों ॥७७॥

यापरी माझें यजन । करूनियां मुनिगण ।

निवारूनि जन्ममरण । माझी सिद्धि जाण पावले ॥७८॥

मुनीश्वरीं साधिली सिद्धी । तेचि उद्धवालागीं त्रिशुद्धी ।

व्हावया कृष्ण कृपानिधी । प्रपंचनिषेधीं वस्तु सांगे ॥७९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel