राजोवाच-अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम् ।

यथा चरति यब्र्हूते यौर्लिङैगर्भगवत्प्रियः ॥४४॥

भक्तां ’पूर्णप्राप्ति’ सुगम । ऐकतां राजा निवाला परम ।

तो भक्तचिन्हानुक्रम । समूळ सवर्म पूसत ॥६३०॥

विदेह म्हणे स्वामी मुनी । पूर्ण प्राप्ति आकळोनी ।

ते भक्त कैसे वर्तती जनीं । तीं लक्षणें श्रवणीं लेववा मज ॥३१॥

भक्तलक्षणभूषण । तेणें मंडित करा श्रवण ।

सावध ऐकतां संपूर्ण । होइजे आपण भगवत्प्रिय ॥३२॥

त्यांचा कोण धर्म कोण कर्म । कैसे वर्तती भक्तोत्तम ।

हृदयीं धरोनि पुरुषोत्तम । त्यांचें बोलतें वर्म तें कैसें ॥३३॥

कोणेपरी कैशा स्थितीं । हरिभक्त हरीस प्रिय होती ।

ऐशिया लक्षणांचिया पंक्ती । समूळ मजप्रती सांगिजे स्वामी ॥३४॥;

विदेहाच्या प्रश्नावरी । संतोषिजे मुनीश्वरीं ।

कविधाकुटा जो कां हरी । तो बोलावया वैखरी सरसावला ॥३५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel