योगं निषेवतो नित्यं, कायश्चेत्कल्पतामियात् ।

तच्छ्रद्दध्यान्न मतिमान्योगमुत्सृज्य मत्परः ॥४३॥

योग साधितां परमार्था । सिद्धी वश्य झालिया हाता ।

त्या त्यागाव्या तत्त्वतां । निजहितार्था लागूनी ॥६९॥

सिद्धी त्यागितां न वचती । भोगबळें गळां पडती ।

तरी ते सांडूनि योगस्थिती । माझे भजनपंथीं लागावें ॥६७०॥

माझिये भक्तीच्या निजमार्गीं । रिगमु नाहीं विघ्नांलागीं ।

मी भक्तांच्या प्रेमभागीं । रंगलों रंगीं श्रीरंग ॥७१॥

सद्भावें करितां माझी भक्ती । भक्तांसी नव्हे विघ्नप्राप्ती ।

भक्त-सबाह्य मी श्रीपती । अहोरातीं संरक्षीं ॥७२॥

करितां भगवद्भजन । भक्तांसी बाधीना विघ्न ।

ते भक्तीचें महिमान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥७३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel