तेभ्यः समभवत्सूत्रं महान्सूत्रेण संयुतः ।

ततो विकुर्वतो जातो योऽहङकारो विमोहनः ॥६॥

ते तिनी गुण भिन्न भिन्न । भिन्नपणें वाढी समान ।

त्या नांव सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या नांव ॥९॥

क्रियाशक्तीस जडपण । तेथ चेतनात्मक उपजे ज्ञान ।

तेंचि महत्तत्त्व नांव जाण । भिन्नाभिधान या हेतू ॥११०॥

महत्तत्त्व आणि प्रधान । दोहींचें रुप एकचि जाण ।

तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान । यालागीं नांवें भिन्न दोहींचीं ॥११॥

क्रियायुक्त जें स्फुरे ज्ञान । तेथ चेतवे अभिमान ।

त्रिगुणीं अहंकार पूर्ण । ते ठायीं जाण उठावे ॥१२॥

अहं खवळल्या दारुण । शिवासी विसरवी शिवपण ।

देहात्मवादें भुलवी पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥१३॥

त्या अहंकाराची मोहक शक्ती । भवभ्रमें पाडी भ्रांती ।

अहंकाराची विकारउत्पत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥१४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel