शय्यासनाटनस्थानवार्ताक्रीडाशनादिकम् ।
मिथुनीभूय विस्त्रब्धौ चेरतूर्वनराजिषु ॥५५॥
सेवितां ज्याची अतिगोडी । तें घालिती येरयेरांच्या तोंडीं ।
जीवेंप्राणें शिणोनी जोडी । तें दे आवडीं स्त्रियेसी ॥५७॥
स्त्रियेसी सांडूनि दूरी । पाऊल न घाली बाहेरी ।
हात धरोनि परस्परीं । आंतबाहेरी हिंडती ॥५८॥
सदा एकांतां बसती । एके स्थानीं दोघें असती ।
दोघें क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदें ॥५९॥
एकांतीं गोड बोली । सासुसासर्यांचा विकल्पु घाली ।
दिराभाव्यांच्या मोडी चाली । बोलाच्या भुलीं भुलवित ॥५६०॥
एके आसनीं बैसती । येरयेरांतें टेंकती ।
एके शय्ये निद्रा करिती । अहोरातीं एकत्र ॥६१॥
मैथुनसुखाचेनि वैभवें । विश्वासोनि जीवेंभावें ।
हिताहित कांही नाठवे । गृहिणीगौरवें नाचतू ॥६२॥
खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम ।
नाममात्रें गृहाश्रम । विषयसंभ्रम वनराजीं ॥६३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.