हंसः सुपर्णो वैकुण्ठो, धर्मो योगेश्वरोऽमलः ।

ईश्वरः पुरुषोऽव्यक्तः, परमात्मेति गीयते ॥२३॥

हंस सुपर्ण वैकुंठ । धर्म योगेश्र्वर श्रेष्ठ ।

अमल ईश्र्वर वरिष्ठ । पुरुष अव्यक्त नामपाठ परमात्मा म्हणती ॥२१॥

ते काळींचे भक्त श्रेष्ठ । या नामांचा नामपाठ ।

गायन करिती घडघडाट । भवसंकट निर्दाळिती ॥२२॥

हें कृतयुगींचें यजन । तुज सांगितलें संपूर्ण ।;

आतां त्रेतायुगींचें भजन । मूर्तीचें ध्यान तें ऐक ॥२३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel