राजोवाच ॥

यानि यानीह कर्माणि यैर्यैः स्वच्छन्दजन्मभिः ।

चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः ॥१॥

मुनीश्र्वरांचें अगाध ज्ञान । त्याहीवरी रसाळ निरुपण ।

तेणें रायाचें वेधलें मन । प्रश्नावरी प्रश्न यालागीं पुसे ॥२९॥

तो म्हणे देवधिदेवो हरि । स्वलीला कैसीं जन्में धरी ।

स्वेच्छा जीं जीं कर्में करी । ते अगाध थोरी मज सांगा ॥३०॥

म्हणती देवा नाहीं जन्म । तेथें कैंचें पुसशी कर्म ।

देवो अरूप अनाम । त्यासी जन्म कर्म असेना ॥३१॥

तो 'अजन्मा' परी जन्म धरी । 'अकर्मा' परी कर्में करी ।

'विदेही' तो देहधारी । होऊनि संसारीं स्वधर्म पाळी ॥३२॥

त्याच्या अवतारांची स्थिति । कवण जन्म कवण व्यक्ति ।

किती अवतार किती मूर्ति । कृपेनें मजप्रती सांगा स्वामी ॥३३॥

जे कां अतीत अनागत । वर्तमान जे प्रस्तुत ।

ते अवतार समस्त । इत्थंभूत सांगावे ॥३४॥

हरिचरित्र अवतारगुण । प्रतिपादन करावयाचा प्रश्न ।

तो सांगावया जयंतीनंदन । स्वानंदें पूर्ण 'द्रुमिल' सांगे ॥३५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel