श्रीभगवानुवाच ।

सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः ।

तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥३॥

सिद्धी अष्टादश जाण । त्यांची धारणा भिन्न भिन्न ।

ऐंसे बोलिले योगज्ञ । योगसंपन्न महासिद्ध ॥३७॥

या नांव गा सिद्धी समस्ता । यांत अष्ट महासिद्धी विख्याता ।

त्या माझे स्वरूपीं स्वरूपस्थिता । आणिकासी तत्त्वतां त्या नाहीं ॥३८॥

मनसा वाचा कर्मणा जाण । विसरोनि देहाचें देहपण ।

माझेनि स्वरूपें अतिसंपन्न । चैतन्यघन जो झाला ॥३९॥

त्यापाशीं या सिद्धी जाण । उभ्या असती हात जोडून ।

परी तो न पाहे थुंकोन । निचाड जाण यापरी ॥४०॥

इतर दहा सिद्धींची कथा । ज्या सत्त्वगुणें गुणभूता ।

साधक शुद्धसत्त्वात्मा होतां । त्यापाशीं सर्वथा प्रकटती ॥४१॥

अष्ट महासिद्धींची कथा । तुज मी सांगेन तत्त्वतां ।

ज्या माझे स्वरूपीं स्वभावतां । असती वर्तता अहर्निशीं ॥४२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel