अहं गतिर्गतिमतां कालः कलयतामहम् ।

गुणानां चाप्यहं साम्यं गुणिन्यौत्पत्तिको गुणः ॥१०॥

गतिमंतांमाजी जे गती । ते मी म्हणे लक्ष्मीपती ।

गतीसी माझेनि निजगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६०॥

चेतनेनें सर्वां गती । ते चेतना चैतन्याची शक्ती ।

चेतनेस्तव इंद्रियप्रवृत्ती । एवं गतीची गती मी एक ॥६१॥

सकळ गतींची परम गती । प्राण्यासी मुख्यत्वें मुक्ती ।

ते मुक्तीसी मजमाजीं मुक्ती । एवं गतीची गती मी एक ॥६२॥

सुरनरां आकळिता । ते जाण काळाची सत्ता ।

त्या काळाचा मी आकळिता । जाण तत्त्वतां मी महाकाळू ॥६३॥

तेहीं गुणांची समानावस्था । ते मी जाण गा निजभक्ता ।

अकृत्रिम गुण जो धर्मता । तो मी तत्त्वतां म्हणे हरी ॥६४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel