क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः ।

एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥३२॥

`आढ्य' कैसेनि म्हणिजे । `दरिद्री' कैसेनि जाणिजे ।

`कृपण' कोणातें बोलिजे । `ईश्वर' वोळखिजे तो कैसा ॥३७०॥

हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सांगावा विशदार्थ ।

जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्थ ॥७१॥

लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा `विपरीत' ।

या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥७२॥

ज्ञानें सज्ञान संतमूर्ती ॥त्यांचा स्वामी तूं निश्चितीं ।

यालागीं तूतें गा `सत्पत्ती' । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥७३॥

माझ्या प्रश्नांची प्रश्नोक्ती । परमार्थप्राप्तीलागीं श्रीपती ।

मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥७४॥

ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण ।

परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥७५॥

प्रथम तीं श्लोकीं यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम ।

इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥७६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel