नैतद्विज्ञाय जिज्ञासोर्ज्ञातव्यमवशिष्यते ।

पीत्वा पीयूषममृतं, पातव्यं नावशिष्यते ॥३२॥

ये ग्रंथींचें जाणितल्या ज्ञान । मुमुक्षु जे साधक जन ।

त्यांसी जाणावया आन । जाणतेपण उरेना ॥९९॥

जेवीं केलिया अमृतपान । पुढें प्राशनासी नुरे आन ।

तेवीं जाणितल्या हें ज्ञान । ज्ञातव्य ज्ञातेपण समूळ नुरे ॥६००॥

आशंका ॥ धर्मार्थकाममोक्षांप्रती । साधने असतीं नेणों किती ।

तुवां हें एकचि श्रीपती । कैशा रीतीं प्रतिपादिलें ॥१॥

उद्धवा साधनें जीं आनान । ते अभक्त सोशिती आपण ।

माझ्या भक्तांसी गा जाण । मीच साधन सर्वार्थी ॥२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel