अमूलमेतद्वहुरुपरुपितं, मनोवचःप्राणशरीरकर्म ।

ज्ञानासिनोपासनया शितेन, च्छित्त्वा मुनिर्गां विचरत्यतृष्णः ॥१७॥

भेदरुपें भवभान । मनसा वाचा कर्म प्राण ।

देहद्वयाचें जें स्फुरण । तें निर्मूळ जाण उद्धवा ॥२१०॥

भेदें बहुरुप भवपटळ । विचारितां तें निर्मूळ ।

विचित्र भासावया भवजाळ । आत्म्यावेगळें स्थळ असेना ॥११॥

आत्म्याहूनि संसार भिन्न । म्हणती ते केवळ अज्ञान ।

त्यांसी बहुरुपें भवभान । देहाभिमान वाढवी ॥१२॥

त्या देहाभिमानाचे पोटीं । कर्माकर्मांची आटाटी ।

जन्ममरणांचिया कोटी । दुःख संकटीं जीव भोगी ॥१३॥

ऐसा दुःखदाता देहाभिमान । समूळ जाणोनियां आपण ।

त्याचें करावया निर्दळण । अनुतापी पूर्ण जो स्वयें होय ॥१४॥

तेणें आचार्यउपास्ती । लाहोनि ज्ञानखड्गाची प्राप्ती ।

गुरुवाक्यसाहणेप्रती । सतेजद्युती खडग केलें ॥१५॥

भववृक्षाचा समूळ कंद । देहाभिमान अतिसुबद्ध ।

अद्वैतसाधनें साधक शुद्ध । तेणें समूळ छेद करावा ॥१६॥

एवं छेदूनि देहाभिमान । उरलेनि आयुष्यें जाण ।

मही विचरती सज्जन । निरभिमान निजनिष्ठा ॥१७॥

तेथ इच्छा निंदा द्वेष तृष्णा । सर्वथा नातळे पैं जाणा ।

मनचि मुकलें मनपणा । इच्छादि तृष्णा तेथ कैंची ॥१८॥

आशंका समूळ संसारनिर्दळण । करी ऐसें तें ज्ञान कोण ।

त्या ज्ञानासी कोण साधन । साधल्या ज्ञान फल काय ॥१९॥

याचें समूळ श्रवण । उद्धवाचें वांछी मन ।

तें जाणोनियां श्रीकृष्ण । स्वयें निरुपण सांगत ॥२२०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel