तदद्भिर्देवयजनं, द्रव्याण्यात्मानमेव च ।

प्रोक्ष्य पात्राणि त्रीण्यद्भिस्तैस्तैर्द्रव्यैश्च साधंयेत् ॥२१॥

तें प्रौक्षणपात्रींचें जळ । नखोदकें न करुनी निर्मळ ।

तेणें पूजासंभार सकळ । कुशाग्रें केवळ प्रोक्षावा ॥७२॥

तेणेंचि प्रोक्षावें देवसदन । आपणासी करावें प्रोक्षण ।

प्रोक्षोनि देवपूजास्थान । पूजाविधान मांडावें ॥७३॥

पाद्य-अर्घ्य-आचमनीयें । तदर्थ मांडावीं पात्रत्रयें ।

जळें पूर्ण करुनि पाहें । भिन्न द्रव्य आहे पात्रत्रयासी ॥७४॥

श्यामाक-दूर्वा-अब्ज-विष्णुकांता । ’पाद्यपात्रीं’ हे द्रव्यशुद्धता ।

गंध पुष्प फल अक्षता । एवं कुशाग्रता ’अर्घ्यपात्रीं’ ॥७५॥

एका वाला जातीफळ । लवंग कर्पूर कंकोळ ।

’आचमनपात्रीं’ हा द्रव्यमेळ । शुद्ध जळ समयुक्त ॥७६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel