दोषबुद्ध्योभयातीतो निषेधान्न निवर्तते ।

गुणबुद्ध्या च विहितं न करोति यथार्भकः ॥११॥

गुणदोषातीत ज्ञाता । तो निषेधीं न वर्ते सर्वथा ।

परी भ्यालेपण चित्ता । नाहीं तत्वतां तयासी ॥१२०॥

तो विहितही कर्म करी । तेथ गुणत्वें बुद्धि न धरीं ।

कुलालचक्राचियेपरी । पूर्वसंस्कारीं वर्तत ॥२१॥

संकल्पु नाहीं वृत्तीं । हेतू स्फुरेना चित्तीं ।

ऐसीं कर्में ज्ञाते करिती । शरीरस्थितीं केवळ ॥२२॥

तेथ सत्कर्म सिद्धी गेलें । तेणें फुगेना म्यां हें केलें ।

अथवा माझारीं विकळ पडिलें । तेणें तगमगिलेंपण नाहीं ॥२३॥

निद्रितामागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्गभोगु ।

त्यासी नाहीं रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा ॥२४॥

गुणदोषीं चित्तवृत्ती । सांडोनिया सहजस्थिती ।

बाळकें जेवीं क्रीडती । तैशी स्थिति ज्ञात्याची ॥२५॥

अभिमानें कर्मप्राप्ती । त्या अभिमानातें त्यागिती ।

मग निरभिमानें केवीं वर्तती । कर्मस्थिती त्यां न घडे ॥२६॥

ऐसा विकल्पु जरी करिसी । ते स्थिति न कळे इतरांसी ।

निरभिमानता स्वानुभवेंसी । केवीं येरासी कळेल ॥२७॥

देह प्रारब्धाचेनि मेळें । स्वभावें सर्व कर्मीं चळे ।

तेथ अज्ञानाचेनि बळें । अभिमानु खवळे मी कर्ता ॥२८॥

तेथ गुरुवाक्यानुवृत्ती । अभ्यासूनि यथानिगुतीं ।

अज्ञानेंसहित निरसिती । अभिमानस्थिति निजबोधें ॥२९॥

शेष- प्रारब्धाचेनि मेळें । निरभिमानें देह चळे ।

ज्ञाते कर्में करिती सकळें । जाण केवळें शारीरें ॥१३०॥

केवळ शारीरें कर्में होतीं । तींच अहेतूक बोलिजेती ।

अर्भकदृष्टांतें उपपत्ती । हेचि स्थिति सांगितली ॥३१॥

निरभिमानाचीं लक्षणें । कृष्ण उद्धवातें ऐक म्हणे ।

येरु आनंदला अंतःकरणें । सादरपणें परिसतू ॥३२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel