धर्मान्भागवतान्ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् ।

यैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥३१॥

परिसावया भागवतधर्मी । श्रवणाधिकारी असों जरी आम्ही ।

तरी कृपा करुनि तुम्हीं । सांगावे स्वामी सकळ धर्म ॥६६॥

नवल या धर्मांची ख्याती । सप्रेम आदरितां प्रीती ।

तेणें तुष्टोनियां श्रीपती । दे सेवकां हातीं आपणिया ॥६७॥

’अजन्मा’ या नामाची ख्याती । वेदशास्त्रीं मिरवी श्रीपती ।

तो भागवतधर्माचिया प्रीती । सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥६८॥

एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण ।

त्यासी तुष्टोनियां नारायण । निजात्मता पूर्ण स्वयें देतु ॥६९॥

भागवतधर्मश्रवणार्थ । मज अधिकारु जरी नसेल येथ ।

तरी मी अनन्य शरणागत । आणि तुम्ही समस्त कृपाळू ॥२७०॥

भूतदयेचें निडारलेपण । तुमच्या ठायीं वोसंडे पूर्ण ।

तुम्ही दयानिधि संपूर्ण । दीनोद्धरण तुमचेनी ॥७१॥

जेथ तुमची कृपा पूर्ण । तेथ न राहे जन्ममरण ।

सर्वाधिकार संपूर्ण । सहज आपण वोळंगे ॥७२॥

तंव तुमचे कृपेपरतें । आन सामर्थ्य नाहीं येथें ।

ऐसें जाणोनियां निश्चितें । शरण तुम्हांतें मी आलों ॥७३॥

कायसी ज्ञातेपणाची लाज । येथें तुमचे कृपें माझें काज ।

ऐसें विदेहें प्रार्थूनि द्विज । चरणरज वंदिलें ॥७४॥

ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । संतोषले नवही जण ।

तेंचि श्रीमुखें नारद आपण । करी निरुपण वसुदेवा ॥७५॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel