तच्छ्रुत्वा तेऽतिसंत्रस्ता विमुच्य सहसोदरम् ।

साम्बस्य ददृशुस्तस्मिन्मुसलं कुलनाशनम् ॥१७॥

ऐकूनि शापाचें उत्तर भयभीत झाले कुमर ।

सोडूनि सांबाचें उदर । अतिसत्वर पाहती ॥६९॥

तंव ते लोहमय मुसळ । देखते झाले तत्काळ ।

मग भयभीत विव्हळ । एकाएकीं सकळ दचकोनि ठेले ॥३७०॥

नासावें यादवकुळ । ऐसा श्रीकृष्णसंकल्प सबळ ।

तोचि झाला लोहाचें मुसळ । जाण तात्काळ ऋषिवाक्यें ॥७१॥

जें जें ब्राह्मणाचें वचन । तें तें अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण ।

ब्राह्मणाचें जें वदे वदन । तें श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥७२॥

देखोनि ऋषीश्वरांचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप ।

यदुकुमरां अतिसंताप । भयें कंप सूटला ॥७३॥

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel