मया संचोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः ।

अण्डमुत्पादयामासुर्ममायतनमुत्तमम् ॥९॥

भूतां परस्परें वैर देख । पृथ्वीतें गिळूं धांवे उदक ।

उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥३६॥

तेजातें प्राशी पवन । पवनातें ग्रासी गगन ।

एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥३७॥

तेथ अंतर्यामिरुपें मी जाण । स्वयें प्रवेशोनि आपण ।

भूतें मेळवूनि पूर्ण । करीं संरक्षण मर्यादा ॥३८॥

माझे मर्यादेची रेखा । पृथ्वी न विरवी उदका ।

उदकातें तेज देखा । न लववी नखा शोषाचे ॥३९॥

तेजातें न प्राशी पवन । वायु स्वेच्छा विचरतां जाण ।

सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥१४०॥

यापरी हीं महाभूतें । एकवटूनि समस्तें ।

स्त्रजिलें ब्रह्मांडातें । मज महापुरुषातें वस्तीशीं ॥४१॥

सप्तावरणेंसीं प्रचंड । आवो साधूनि उदंड ।

निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥४२॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel