पितृदेवमनुष्याणां, वेदश्चक्षुस्तवेश्वर ।

श्रेयस्त्वनुपलब्धेऽर्थे, साध्यसाधनयोरपि ॥४॥

नाथिलेंचि चराचर । देव मनुष्य आणि पितर ।

वेदें प्रकाशूनि साचार । पूज्यत्वें थोर प्रतिपादी ॥५३॥

त्याहीमाजीं अतिविषम । उत्तम मध्यम आणि अधम ।

हा त्रिविध भेदसंभ्रम । वेद उपक्रम करुनि दावी ॥५४॥

यापरी गुणदोषलक्षण । तुवांचि वाढविलें आपण ।

या नांव म्हणसी मोक्षसाधन । तरी कां गुणदोष निवारिसी ॥५५॥

ऐशिया निरुपणघडामोडी । तुझेनि बोलें पडे आडी ।

तेणें गुणदोषांची परवडी । बाधा रोकडी अंगीं वाजे ॥५६॥

अवघा संसार काल्पनिक । तेथ एक स्वर्ग एक नरक ।

हा मोक्ष हा अतिबंधक । येणें वेदवादें लोक भ्रमविले तुवां ॥५७॥

पूर्वी पुरुषाचे पोटीं । नव्हती गुणदोषांची गोठी ।

तुझ्या वेदानुवादपरिपाठीं । गुणदोषीं दृष्टी दृढ झाली ॥५८॥

एवं तुझेनि बोलें जाण । लोकांसी आली नागवण ।

’भोगावया’ नरक दारुण । भ्रामक जाण वेदोक्ति तुझी ॥५९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel