न किञ्चित्साधवो धीरा, भक्ता ह्येकान्तिनो मम ।

वाञ्छन्त्यपि मया दत्तं, कैवल्यमपुनर्भवम् ॥३४॥

ज्यासी नघेणेंपणाचा प्रबोधु । साचार झाला अतिविशदु ।

ऐसा निरपेक्ष जो शुद्धु । तो सत्य साधु मज मान्य ॥२॥

ज्याच्या ठायीं निरपेक्षता । धैर्य त्याचे चरण वंदी माथां ।

ज्याच्या ठायीं अधीरता । तेथ निरपेक्षता असेना ॥३॥

कोटिजन्में बोधु जोडे । तैं हे निरपेक्षता आतुडे ।

निरपेक्षतेवरुतें चढे । ऐसें नाहीं फुडें साधन ॥४॥

ऐशिये निरपेक्षताप्राप्तीं । माझ्या भजनीं अतिप्रीती ।

ती लाभे माझी चौथी भक्ती । जीसी ’एकांती’ म्हणे वेदु ॥५॥

ऐक एकान्तभक्तीची मातु । देवाभक्तांसी होय एकांतु ।

भक्त रिघे देवाआंतु । देव भक्तांतु सबाह्य ॥६॥

ऐसें अभेद माझें भजन । या नांव ’एकांतभक्ति’ जाण ।

मजवेगळें कांहीं भिन्न । न देखे आन जगामाजीं ॥७॥

त्यांसी चहूं पुरुषार्थेंसीं मुक्ती । मी स्वयें देताहें श्रीपती ।

ते दुरोनि दृष्टीं न पाहती । मा धरिती हातीं हें कदा न घडे ॥८॥

ते स्वमुखें कांहीं मागती । हें न घडे कदा कल्पांतीं ।

सांडूनि माझी एकांतभक्ती । कैवल्य न घेती ते निजभक्त ॥९॥

मोक्षही न घ्यावया कोण भावो । त्याचाही मथित अभिप्रावो ।

स्वयें सांगे देवाधिदेवो । अगम्य पहा हो श्रुतिशास्त्रां ॥४१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel